ADVERTISEMENT

८ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबद्दल Madhavi Juvekar चं मन मोकळं वक्तव्य – “मी खऱ्या पैशांवर नाचलेच नाही!”

२०१७ साली एका बेस्ट पार्टीतील डान्स व्हिडीओवरून टीकेची झोड उठल्यानंतर अभिनेत्री Madhavi Juvekar ने आता आठ वर्षांनंतर या घटनेबाबत खुलं वक्तव्य केलं आहे. ती खरी आहे, हे वेळोवेळी सिद्ध करताना, माधवीने तिच्या अनुभवातून मीडियालाही सवाल विचारला आहे.
Madhavi Juvekar

अभिनेत्री Madhavi Juvekar सध्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे चर्चेत आहे. मालिकेत ती एक नकारात्मक भूमिका साकारत असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यात Madhavi Juvekar ही खूप संवेदनशील आणि स्पष्टवक्त्या स्वभावाची आहे. याच पार्श्वभूमीवर, 2017 साली घडलेल्या एका वादग्रस्त घटनेबाबत तिने नुकतीच मोकळी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तिने त्या प्रसंगामागचं सत्य उलगडलं आहे.

8 वर्षांपूर्वी बेस्टच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात Madhavi Juvekar आणि तिच्या सहकाऱ्यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत अभिनेत्रीने तोंडात नोटा धरून नृत्य केल्याचे दृश्य दिसत होतं आणि काही सहकर्मचारी पैसे उधळताना दिसत होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांपासून ते मुख्य प्रवाहातील मीडियापर्यंत अनेक ठिकाणी टीकेची झोड उठली. विभागीय चौकशी सुद्धा झाली.

हे पण वाचा.. Dance Vedio: झाल्या तिन्ही सांजा… ‘पारू’ मालिकेतील खलनायिकांचा मोहक नृत्य व्हिडीओ व्हायरल!

पण आता, ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत Madhavi Juvekar ने स्पष्ट केलं की त्या पैशा खऱ्या नव्हत्या आणि संपूर्ण प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला. “ते आमचं नाटकाचं दसऱ्याचं सेलिब्रेशन होतं. त्या नोटा ‘चिल्ड्रन्स बँक’च्या होत्या. मी सुरुवातीला खऱ्या समजल्या, पण नंतर लक्षात आलं त्या नकली होत्या,” असं ती म्हणाली.

Madhavi Juvekar पुढे म्हणते, “मी नैतिकतेच्या विरुद्ध काहीही करत नाही. आयुष्यात कधीच खऱ्या पैशांवर नाचू शकत नाही. जे काही दाखवलं गेलं, ते पूर्णपणे विपरित होतं. जेव्हा प्रसंग घडला, तेव्हा दोन मंत्र्यांचा मला थेट फोन आला होता. त्यांनी विचारलं, ‘नेमकं काय झालं?’ आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की काही चुकीचं झालेलं नाही.”

तिने आपल्या भावना व्यक्त करताना पुढे सांगितलं, “माझ्याबरोबर 13 लोक होते, पण या मध्ये  सर्वात जास्त टीका माझ्यावर झाली कारण मी जास्त प्रसिद्ध होते. त्यामुळेच टीकेचं धनी मला व्हावं लागलं. भाजीवाले, कंडक्टर, ड्रायव्हर सगळ्यांना मी ओळखीची होते. त्यामुळे लोक लगेच माझ्याकडे बोट दाखवायला लागले. मी मात्र आताही तितकीच खरी आहे जितकी तेव्हा होते.”

हे पण वाचा..Subodh Bhave झी मराठीवर ६ वर्षांनंतर परततो; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत साकारणार भूमिका!

या घटनेदरम्यान मीडिया कशी लागली यावरही तिने नाराजी व्यक्त केली. “कोणतीही शहानिशा न करता थेट आरोप केले गेले. मला विचारण्याची तसदीही घेतली गेली नाही. माझ्या घरी पत्रकार पोहोचले, मी मुलीचा अभ्यास घेत होते आणि टीव्हीवर सतत माझ्या बातम्या दाखवल्या जात होत्या. मी उत्तर द्यायला तयार होते, पण कोणालाही ते हवंच नव्हतं,” असं ती म्हणाली.

Madhavi Juvekar सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद तिला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. पण तिच्या या धाडसी आणि स्पष्ट वक्तव्यानंतर, प्रेक्षकांना तिच्या प्रतिमेच्या दुसऱ्या बाजूची झलक मिळाली आहे.