बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडती आणि प्रिय जोडप्यांपैकी एक असलेली Genelia Deshmukh आणि रितेश देशमुख यांची केमिस्ट्री ही नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. यंदा 5 ऑगस्ट रोजी Genelia Deshmukh हिने तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला. याच खास दिवशी एक गमतीशीर किस्सा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.
Genelia Deshmukh हिचा जन्म मुंबईत एका कॅथलिक कुटुंबात झाला. ती लहानपणापासूनच स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवणारी मुलगी होती. राज्यस्तरीय स्प्रिंटर आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू म्हणून तिची ओळख होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या माध्यमातून ग्लॅमर वर्ल्डमध्ये प्रवेश केला. पुढे 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून तिचं बॉलिवूड पदार्पण झालं, आणि त्याच चित्रपटात तिची भेट रितेश देशमुखशी झाली.
पहिल्या भेटीत रितेशला Genelia अतिशय आवडली होती. पण Genelia ला त्यावेळी रितेश बद्दल एक गैरसमज होता — तो एका राजकीय कुटुंबातून असल्यामुळे गर्विष्ट असेल, असं तिला वाटलं. त्यामुळे तिने सुरुवातीलाच त्याच्याशी फारसे मैत्रीपूर्ण संबंध ठेवले नाहीत. मात्र, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात मैत्री वाढली आणि ती मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. जेव्हा Genelia 16 वर्षांची होती आणि रितेश 24 वर्षांचा होता, तेव्हापासून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.
हे पण वाचा.. “Rupali Ganguly यांचा सवाल: ‘आम्हीही मेहनत करतो… टेलिव्हिजन कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार का नाही?’”
10 वर्षांच्या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपनंतर त्यांनी 2012 मध्ये विवाह केला. आज त्यांना दोन गोंडस मुले आहेत आणि ते एक परिपूर्ण कुटुंब म्हणून चाहत्यांच्या मनात स्थान मिळवून आहेत.
या जोडप्याने ‘वेड’, ‘मिस्टर मम्मी’ यांसारख्या प्रेक्षकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. विशेषतः ‘वेड’ या मराठी सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत रितेशने आपल्या कॉलेजमधल्या एका जुन्या क्रशचा उल्लेख केला.
तो म्हणाला, “कॉलेजमध्ये असताना एक मुलगी मला खूप आवडायची, पण मी तिला हे कधीच सांगू शकलो नाही.” हे ऐकत असताना Genelia त्यांच्या शेजारीच बसलेली होती. आणि रितेशचं हे बोलणं ऐकताच तिने हसत हसत उत्तर दिलं, “बरं झालं, याने तिला सांगितलं नाही!” तिच्या या मिश्कील टोल्यावर तिथे उपस्थित असलेले सर्वांच हसू लागले.
हे हास्यविनोदाचे क्षण म्हणजे त्यांच्या नात्याची खासियत आहे. एकमेकांशी इतकी वर्षं एकनिष्ठ राहिलेलं हे जोडपं आजही एकमेकांवर तितकंच प्रेम करतं, जेवढं त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळात होतं.
Genelia Deshmukh ने अलीकडेच आमिर खानसोबत ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही भावला. या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती केवळ सौंदर्यवान अभिनेत्री नसून अभिनयक्षमही आहे.
Genelia Deshmukh आणि रितेश देशमुख यांची प्रेमकहाणी ही फक्त सिनेमापुरती मर्यादित नाही, तर ती वास्तवातही तितकीच सुंदर आहे. त्यांचे परस्पर प्रेम, आदर आणि विनोद यामुळेच ते इतक्या वर्षांनीही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम राखून आहेत. वाढदिवशी Genelia चा हा किस्सा पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी गोड आठवण ठरला आहे.









