ADVERTISEMENT

Chhaya Kadam कोकणात रमल्या; साधेपणाने जिंकली मने, खास क्षण चाहत्यांसोबत शेअर

अभिनय क्षेत्रात व्यग्र असलेल्या Chhaya Kadam यांनी घेतला गावाकडचा विरंगुळा, कोकणातील खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत साधेपणाची दिली जाणीव.
Chhaya Kadam

ग्लॅमरच्या दुनियेत झगमगणाऱ्या कलाकारांना वेळ मिळाला की, काहीजण परदेशात जाऊन आराम करतात, तर काही मात्र आपल्या मुळ गावात जाऊन खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घेतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार अभिनय करणारी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) ह्यांनीदेखील अशीच शांतीची वाट निवडली आहे. त्यांनी नुकताच कोकणातील त्यांच्या मुळगावी – धामापुर – येथे दोन दिवसांची खास सफर केली आणि ह्या अनुभवाचे काही निवडक क्षण सोशल मीडियावर शेअर केले.

सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमुळे व्यस्त असलेल्या Chhaya Kadam यांनी वेळ काढत आपल्या गावची वाट धरली. त्यांच्या कोकण भेटीचे व्हिडीओ आणि फोटो पाहता, ती फक्त सुट्टी नव्हे तर एक भावनिक नातेसंबंध जपण्याची एक सुंदर भेट होती असं म्हणावं लागेल.

Chhaya Kadam यांनी इन्स्टाग्रामवर  शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये त्या घराच्या अंगणात निवांत बसून कोकणाच्या हिरवळीचा आनंद घेताना दिसतात. दुसऱ्या व्हिडीओत त्यांच्या वहिनी रांगोळी काढताना दिसत आहेत, जी कोकणातील सणासुदीची सुंदर परंपरा दर्शवते. तिसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी गावातील मंदिराचं दर्शन घडवलं आहे.

याशिवाय, नागपंचमीच्या निमित्ताने घरात बनवलेल्या पारंपरिक शिरवाळ्याचा देखील त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला. खास म्हणजे, त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचीही ओळख चाहत्यांना करून दिली – जे अनेकांसाठी एक भावनिक आणि माणुसकीचा क्षण होता.

एका व्हिडीओमध्ये त्या ‘मन तळ्यात मळ्यात‘ हे गाणं गुणगुणताना दिसतात. तर दुसऱ्या क्लिपमध्ये Chhaya Kadam गावातील निसर्ग, गारवा, आणि घरच्या अंगणातील क्षण मनमोकळेपणाने एन्जॉय करताना दिसतात. खास म्हणजे, त्यांनी गणपती आगमनाबद्दलही आनंद व्यक्त केला आहे. “आता कोकणात गणपती येणार, खेळ, नैवेद्य, सणाचं वेगळंच वातावरण असणार” असं त्या प्रेमाने सांगतात.

हे पण वाचा.. Prathamesh Parab चा मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवास; टीसीकडून मिळाली अनोखी शिक्षा!

Chhaya Kadam यांचं हे कोकणप्रेम आणि त्यांच्या साधेपणाने भरलेले क्षण सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांच्या ह्या पोस्टवर प्रतिक्रियांची बरसात केली असून – “साधेपणात मोठेपणा”, “खऱ्या नायिकेचा खरा चेहरा” अशा प्रतिक्रिया मिळत आहेत.

अभिनयात जेवढी ताकद त्यांनी दाखवली आहे, तेवढीच त्यांची मूल्यं आणि मातीशी असलेली नाळ या व्हिडीओंमधून दिसून येते. झगमगाटाच्या पलीकडे एक हळवा आणि मोकळा चेहरा या व्हिडीओंनी चाहत्यांना पाहायला दिला आहे.

हे पण वाचा.. Vallari Viraj ने व्यक्त केली खास इच्छा म्हणाली – “भविष्यात जुळी मुलं हवीत…”