ADVERTISEMENT

Tara Sutaria चं नवीन नातं चर्चेत; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा

बॉलीवूड अभिनेत्री Tara Sutaria आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर गाजत आहेत. एका व्हायरल व्हिडीओनंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
Tara Sutaria

Tara Sutaria चं नवीन नातं चर्चेत; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा

बॉलीवूडमध्ये नेहमीच नव्या कपल्सच्या चर्चा रंगत असतात. सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे अभिनेत्री Tara Sutaria. तिचं नाव आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया याच्यासोबत जोडलं जात आहे. या दोघांचा एक रोमँटिक व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांनी जोर पकडला आहे.

काही दिवसांपूर्वी Tara Sutaria ने धुंदाई इंडिया कॉउचर वीकमध्ये रॅम्पवॉक केला होता. या कार्यक्रमात वीर पहारिया प्रेक्षकांमध्ये उपस्थित होता. रॅम्पवरून चालत असताना Tara ने त्याच्याकडे पाहत उंच हात करून फ्लाईंग किस दिला. यानंतर वीरच्या चेहऱ्यावर हास्य झळकले आणि त्याने देखील हळूच प्रतिक्रिया दिली. हे दृश्य इतकं क्यूट होतं की सोशल मीडियावर त्या क्षणाचा व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल झाला

Tara Sutaria चं नाव यापूर्वी आदर जैन सोबत जोडलं गेलं होतं. आदर हा रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा आहे. हे दोघं जवळपास तीन वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला आणि नंतर आदर जैनने अलेखा अडवाणीशी लग्न केलं.

यानंतर Tara Sutaria चं आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं ते वीर पहारिया मुळे. दोघं अनेकदा एकत्र पाहिले गेले आहेत. एका डिनर डेटपासून ते इव्हेंट्सपर्यंत त्यांचं एकत्र असणं नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. विशेष म्हणजे Tara ने अलीकडेच इंस्टाग्रामवर ‘थोडी सी दारू‘ या म्युझिक व्हिडीओचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंवर वीरने रेड हार्ट आणि स्टार इमोजी टाकत कमेंट केली होती. त्याला उत्तर देताना Tara ने ‘Mine‘ असं लिहिलं आणि चाहत्यांनी दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं.

मात्र एका मुलाखतीत जेव्हा Tara Sutaria ला वीरसोबतच्या नात्याबाबत थेट विचारण्यात आलं, तेव्हा तिने सांगितलं, “माफ करा, मी यावर काहीही बोलू शकत नाही.” तिचं हे उत्तर जरी नकारात्मक असलं तरीही नातं लपवण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

वीर पहारिया कोण आहे, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वीर हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून त्याची आई स्मृती शिंदे पहारिया या ‘सोबो फिल्म्स‘ची संस्थापक आहेत. स्मृती शिंदे यांनी अनेक टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. वीरचा भाऊ शिखर पहारिया सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं. खासदार प्रणिती शिंदे या वीरच्या मावशी आहेत.

वीर पहारिया ने अलीकडेच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘Sky Force’ या चित्रपटात त्याने अभिनेता अक्षय कुमार सोबत काम केलं असून त्याचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

सध्या Tara Sutaria आणि वीर पहारिया यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघंही यावर अधिकृतपणे काही बोलले नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी आणि सार्वजनिक उपस्थितींमुळे त्यांच्या प्रेमसंबंधांची शक्यता अधिकाधिक बळकट होत चालली आहे.

हे पण वाचा ..“Sachin Pilgaonkar” यांचं लेकीवर कौतुक, म्हणाले – ‘तू दाखवून दिलंस कलाकाराचं खरं सामर्थ्य!’