ADVERTISEMENT

“काळवीट प्रकरणाचा हाय-प्रोफाइल ट्विस्ट: Jagdeep Dhankhar यांनी वाचवला Salman Khan चा तुरुंगवास!”

1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या Salman Khan ला जामीन मिळवून देण्यात वरिष्ठ वकील आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणातील त्यांचा थेट सहभाग आज पुन्हा चर्चेत आला आहे.
Salman Khan

1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या Salman Khan ला जामीन मिळवून देण्यात वरिष्ठ वकील आणि माजी उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणातील त्यांचा थेट सहभाग आज पुन्हा चर्चेत आला आहे.

सलमान खानच्या 27 वर्ष जुन्या प्रकरणातील जगदीप धनखड यांचा महत्त्वाचा सहभाग

बॉलीवूड सुपरस्टार Salman Khan चा काळवीट शिकार प्रकरणाशी असलेला संबंध आजही चर्चेचा विषय ठरतो. 1998 मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे ‘हम साथ-साथ हैं‘ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन काळवीट मारल्याचा आरोप सलमान आणि इतर कलाकारांवर झाला. या प्रकरणात त्याच्यासह सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावरही कारवाई झाली. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात सलमान खानला जामीन मिळवून देण्यात तत्कालीन वरिष्ठ वकील आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Jagdeep Dhankhar यांची कायदेशीर लढाई

Jagdeep Dhankhar हे एक प्रख्यात वकील तसेच संविधान तज्ञ मानले जातात. जोधपूर पोलिसांनी Salman Khan ला अटक केली तेव्हा हा खटला लढणारे पहिले वकील धनखड होते. त्यांच्या युक्तिवादामुळे सलमानला प्राथमिक टप्प्यातच जामीन मिळाला. धनखड यांनी फक्त सलमानच नव्हे, तर या प्रकरणातील इतर सहकलाकारांचंही प्रतिनिधित्व केलं होतं.

Jagdeep Dhankhar यांनी न्यायालयात पोलिस तपासातील विसंगती दाखवून दिली होती. त्यांनी गावकऱ्यांच्या साक्षीबाबत प्रश्न उपस्थित करत विचारलं होतं की, “जर खरोखर कलाकार शिकारी करताना दिसले, तर त्यांचा पाठलाग का करण्यात आला नाही?”

काळवीट प्रकरणाची पार्श्वभूमी

राजस्थानमधील कांकाणी गावात घडलेल्या या घटनेत काळवीटाच्या बेकायदेशीर शिकार प्रकरणात Salman Khan आणि इतर कलाकारांचा समावेश होता. भारत सरकारच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत काळवीट संरक्षित प्रजाती असल्याने हे प्रकरण तात्काळ गंभीर बनले.

5 एप्रिल 2018 रोजी सलमानला दोषी ठरवून जोधपूर सेंट्रल जेलमध्ये दोन दिवस ठेवण्यात आलं. मात्र, 7 एप्रिल 2018 रोजी सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार जोशी यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला.

हे पण वाचा…अशोक सराफच्या गाण्यावर चिमुकल्याचा भन्नाट डान्स, Nivedita Saraf भारावल्या; म्हणाल्या, “बाळा तुझा हा व्हिडीओ…”

धनखड यांची प्रतिक्रिया

एका जुन्या मुलाखतीत Jagdeep Dhankhar यांनी सांगितलं होतं की, Salman Khan ने पोलिस तपासात पूर्ण सहकार्य केलं होतं, त्यामुळे त्याला जामीन मिळवून देणे ही न्याय्य गोष्ट होती. मात्र, नंतरच्या टप्प्यात त्यांनी सलमानचं प्रतिनिधित्व केलं नाही.

Jagdeep Dhankhar यांचा राजकीय प्रवास

कायदेशीर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यानंतर जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) राजकारणात सक्रिय झाले आणि नंतर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. अलीकडेच आरोग्य कारणांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला, पण त्यांची Salman Khan च्या हाय-प्रोफाइल प्रकरणातील भूमिका आजही लोकांच्या आठवणीत ताजी आहे.