Mukta Barve : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेने सोशल मीडियावर तिच्या कुरळ्या केसांविषयी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने स्वतःच्या मूळ व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार करण्याचा सकारात्मक संदेश दिला आहे.
मुक्ता बर्वेचा स्वाभाविकतेकडे प्रवास
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी अभिनेत्री Mukta Barve ही तिच्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहते. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत यशस्वी कामगिरी करणारी ही अभिनेत्री नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर जोडलेली असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
कुरळ्या केसांविषयीचा संघर्ष
Mukta Barve ने या पोस्टमध्ये तिच्या कुरळ्या केसांविषयीचा एक खास अनुभव शेअर केला आहे. “मला कित्येक वर्षं असं वाटायचं की माझे केस हट्टी आणि त्रासदायक आहेत, म्हणून मी त्यांना नेहमी सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण एक दिवस मला जाणवलं की, जसे मी आहे तसेच स्वतःला स्वीकारायला हवं,” असं ती म्हणते. तिच्या पोस्टसोबत तिने कुरळे आणि सरळ केस असे दोन फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या या प्रवासाचं प्रतिनिधित्व करतात.
हे पण वाचा.. ‘Tharala Tar Mag end’ चर्चेला पूर्णविराम; अमित भानुशालीचा खास संदेश
चाहत्यांना दिला सकारात्मक संदेश
Mukta Barve पुढे म्हणते, “जर तुमचे केस कुरळे असतील तर त्यांच्याशी लढा देण्यात आयुष्य वाया घालवू नका. आपल्या मूळ स्वरूपाचा अभिमानाने स्वीकार करायला हवा.” तिने या पोस्टमधून चाहत्यांना एक विचारही दिला – “आपण आहोत तसं स्वतःला स्वीकारावं का बदलावं?” तिचा हा आत्मविश्वासपूर्ण संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
करिअरमधील अविस्मरणीय कामगिरी
Mukta Barve ही अभिनयक्षेत्रातील एक मान्यवर नाव आहे. तिने रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातून वयाच्या १५ व्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यानंतर ‘जोगवा’ या चित्रपटातील तिच्या दमदार भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील राधा ही भूमिका, तसेच ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपट मालिकेतील तिचं काम प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.
चाहत्यांच्या हृदयातील मुक्ता
Mukta Barve आणि स्वप्नील जोशीची जोडी मराठी सिनेप्रेमींसाठी नेहमीच खास राहिली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटाच्या तीनही भागांना प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, आता प्रेक्षक चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Mukta Barve च्या या पोस्टने तिच्या चाहत्यांना स्वतःचा स्वीकार करण्याचा संदेश दिला आहे. सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य रूप नव्हे, तर आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलची सकारात्मकता हेही त्याचे महत्त्वाचे घटक आहेत, हेच ती आपल्या अनुभवातून सांगते.
हे पण वाचा.. Rupali Bhosle चा घोडबंदर रोडवरील संताप; “वाईट, बेकार, पथेटिक” म्हणत शेअर केला व्हिडीओ









