Rupali Bhosle हिने घोडबंदर रोडच्या खड्ड्यांवर संताप व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. पावसाळ्यात वाढलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तिने प्रशासनावर टीका केली असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
घोडबंदर रोडच्या खड्ड्यांवर अभिनेत्री रुपाली भोसलेचा संताप; व्हिडीओ व्हायरल
मुंबई-ठाण्यात पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांना दररोज प्रवास करताना होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मीडियावर आवाज उठवण्याची परंपरा आता सेलिब्रिटींनीही स्वीकारली आहे. मराठी टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री Rupali Bhosle हिने नुकताच घोडबंदर रोडची दयनीय अवस्था दाखवणारा व्हिडीओ शेअर करत प्रशासनावर संताप व्यक्त केला.
Rupali Bhosle सध्या स्टार प्रवाहवरील आगामी मालिकेच्या शूटिंगसाठी दररोज घोडबंदर मार्गे प्रवास करते. तिच्या म्हणण्यानुसार, ज्या रस्त्याने सामान्यपणे अर्ध्या तासात घरी पोहोचता येतं, त्या रस्त्याची अवस्था इतकी खालावली आहे की आता तिला तोच प्रवास पूर्ण करायला दोन तास लागतात. “या घोडबंदर रोडला रस्ता म्हणायचं का? हे वाईट, बेकार, पथेटिक आहे!” अशा कठोर शब्दांत रुपालीने नाराजी व्यक्त केली.
हे पण वाचा..Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ मध्ये Vidya Balan ची खास भूमिका व्यक्त केल्या भावना; म्हणाली…
Rupali Bhosle ने व्हिडीओमध्ये सांगितलं, “मी ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या काळातही विरारहून येत होते, त्यावेळीही हा रस्ता अशाच अवस्थेत होता. पाच वर्षे झाली, पण परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. रात्रभर शूट करून पहाटे घरी जाताना ट्राफिक आणि खड्डे यांचा सामना करावा लागतो. हा प्रवास खूप त्रासदायक आहे.”
Rupali Bhosle चा हा व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “ठाण्याचे रस्ते लडाखपेक्षा वाईट आहेत”, “घोडबंदर रोड कितीही रिपेअर केला तरी काही फरक नाही” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अनेक कलाकार आणि सामान्य नागरिकांप्रमाणेच रुपालीनेही हा मुद्दा थेट सोशल मीडियावर मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरवस्थेचा विषय चर्चेत आला आहे.
हे पण वाचा..“Ketki Chitale वादग्रस्त विधान: ‘मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का?’”









