Janhavi Killekar : “मी हिरॉइनपेक्षा सुंदर वाटले म्हणून मला मालिकेतून काढून टाकलं  होत”

Janhavi Killekar

Janhavi Killekar : सौंदर्यामुळे संधी गमावावी लागल्याचा अनुभव अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने शेअर केला आहे. एका मुलाखतीत तिने मालिकांमधील तिच्या रिजेक्शनचा अनुभव उघड केला.

“माझं सौंदर्यच माझ्या विरोधात ठरलं”; जान्हवी किल्लेकरचा खुलासा

मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री Janhavi Killekar ने अलीकडेच एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या ओळखीला आलेली आणि चर्चेत आलेली जान्हवी किल्लेकरने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात केवळ आपल्या सौंदर्यामुळे एका मालिकेतून नाकारण्यात आल्याचा खुलासा केला आहे.

Janhavi Killekar ने दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, २०१२ साली स्टार प्रवाहवर आलेल्या ‘एक नंबर’ या मालिकेसाठी तिने खूप वेळा ऑडिशन दिल्या होत्या. त्या वेळी ती मालिका मिळण्याची शक्यता प्रबळ असताना देखील तिला नकार देण्यात आला. यामागचं कारण ऐकून खुद्द जान्हवीलाही धक्का बसला होता. “माझं रूप हिरॉइनपेक्षा अधिक उठून दिसतं, त्यामुळे मी तिच्या तुलनेत जास्त उठून दिसेल, म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं,” असं जान्हवी म्हणाली.

ती पुढे म्हणाली, “त्या मालिकेत हिरॉइनच्या बहिणीची भूमिका होती. ती भूमिकाही सतत स्क्रीनवर दिसणारी होती. पण नुसत्या सौंदर्याच्या कारणावरून मला काम नाकारलं गेलं, ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली होती.” या अनुभवामुळे मनोरंजनसृष्टीत सौंदर्याचादेखील एक वेगळा दृष्टिकोन असतो, हे तिला नव्याने जाणवले.

Janhavi Killekar या प्रवासात अनेक वेदना सहन केल्याचं सांगितलं. “तेव्हा दररोज मला ऑडिशनसाठी बोलावलं जायचं. दररोज नवा लुक, दररोज लुक टेस्ट, दररोज नवा मेकअप… आणि शेवटी म्हणायचं की तुझं काही होणार नाही. असं जर ठरवलं होतं तर आधीच सांगायला हवं होतं ना?” अशी खंत तिने व्यक्त केली.

हे पण वाचा..Man Pasand Ki Shaadi मालिकेत मराठी कलाकारांची लक्षणीय हजेरी! सुचित्रा बांदेकर, मिलिंद गवळी यांच्यासह नवे चेहरे

तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या डोळ्यांमुळेही तिला अनेकदा निगेटिव्ह रोलमध्येच पाहिलं गेलं, असं जान्हवी म्हणाली. “माझ्या डोळ्यांमुळे लोकांना मी सतत व्हिलन वाटते. मला माहित नाही का, पण आजवर मी केलेल्या जवळपास सगळ्याच भूमिका निगेटिव्ह होत्या. ही गोष्टही मनाला लागणारी आहे,” असं सांगताना ती थोडी भावूक झाली होती.

जान्हवीने पुढे सांगितले की, तिच्या आवाजामुळेही तिला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. “तुझा आवाज नाकातून येतो, असं लोक सतत म्हणायचे. त्यामुळे मी आता प्रत्येक सीन करताना आवाजावर अधिक काम करते. मला आता जाणवतं, की आवाज हा देखील अभिनयाचा महत्वाचा भाग आहे,” असं तिने स्पष्ट केलं.

जान्हवीच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर बिग बॉस मराठीनंतर तिने ‘अबोली’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. याआधी ती ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. शिवाय ‘कोळीवाडा झिंगला’ हे तिचं गाणं देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं.

हे पण वाचा ..Ved 2 आमचं आधीच ठरलेलं होतं,जिनिलिया देशमुखची ‘वेड 2’ बाबत मोठी घोषणा !

एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान जान्हवी म्हणाली की, “दुनियादारी मला अजून शिकायची आहे. पण ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने मला खूप काही शिकवलं. मोठ्या कलाकारांसोबत काम करताना त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, सेटवरील वागणूक या सगळ्यांमधून मी कलाकार म्हणून घडले.”

Janhavi Killekar ने आपल्या संघर्षाच्या काळातील कटू अनुभव शेअर करताना स्पष्टपणे दाखवून दिलं की, अभिनय क्षेत्रात केवळ टॅलेंट असून भागत नाही. सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, आणि कधी कधी केवळ ‘लुक्स’च्या नावाखालीही कलाकारांना अनेकदा दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र तरीही जान्हवी आजही आत्मविश्वासाने आपल्या कारकिर्दीचा प्रवास सुरू ठेवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *