Tesla Model Y Price in India : मुंबईत टेस्ला चा पहिला शोरूम सुरु, आनंद महिंद्रांनी एलन मस्कचं स्वागत करत स्पर्धेचा दिला इशारा! किंमत आणि करामुळे ‘टेस्ला’ खिशाला जड, पण भारतात EV स्पर्धेला मिळणार वेग!
भारतात Tesla Model Y ची अधिकृत एंट्री; आनंद महिंद्रांचा एलन मस्कला संदेश, “चार्जिंग स्टेशनवर भेटूच!”
जगभरातील सर्वात चर्चेत असलेली इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Tesla अखेर भारतात दाखल झाली असून, आपल्या Tesla Model Y Price in India सह पहिल्या अधिकृत शोरूमचा शुभारंभ मुंबईत केला आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी थेट एलन मस्क यांना अभिनंदन करत स्पर्धेचं स्वागत केलं आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) मधील Maker Maxity Mall मध्ये उभारण्यात आलेल्या या शोरूमला ‘Tesla Experience Centre’ असं नाव देण्यात आलं आहे. येथून टेस्ला कंपनीने आपल्या Model Y या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV च्या विक्रीचा भारतात औपचारिक प्रारंभ केला आहे. या गाडीची किंमत मुंबईमध्ये तब्बल 61 लाख रुपये पासून सुरू होत असून, विविध मॉडेल्स आणि रंगांनुसार या किंमतीमध्ये बदल आहे.
आनंद महिंद्रांचा स्पर्धेला खुला संदेश
आनंद महिंद्रांनी या संदर्भात ट्विट करत म्हटलं आहे, “Welcome to India, @elonmusk and @Tesla. One of the world’s largest EV opportunities just got more exciting. Competition drives innovation, and there’s plenty of road ahead. Looking forward to seeing you at the charging station.” या ट्विटमधून महिंद्रांनी थेट एलन मस्कला स्पर्धेसाठी तयार असल्याचा दिलासा संदेश दिला आहे.
महिंद्रांनी याआधीही एलन मस्कला “It’s time you got out here, Elon” असं मजेशीर पण थेट आव्हान दिलं होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजार हा संधींनी भरलेला आहे आणि या स्पर्धेमुळेच नव्या नव्या गोष्टींची सुरुवात होणार आहे.
हे पण वाचा ..mahindra xuv 3xo झाली ४ लाखांनी स्वस्त; पण यात मोठा ट्विस्ट आहे!
Tesla Model Y : भारतात इतकी महाग का?
भारतात Tesla Model Y Price in India इतकी जास्त का आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. याचे मुख्य कारण म्हणजे आयात वाहनांवर भारत सरकारकडून लावले जाणारे 70% पर्यंतचे टॅरिफ आणि 30% पर्यंतचा लक्झरी कर. यामुळे Tesla Model Y ची किंमत अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत जवळपास दुप्पट भासत आहे.
टेस्लाच्या CFO Vaibhav Taneja यांनी याबाबत स्पष्ट सांगितले की, सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांवर आयात शुल्कामुळे हा किंमतीचा मोठा फरक आहे.
Tesla Model Y च्या किंमती : मुंबई विरुद्ध दिल्ली
दिल्ली आणि मुंबईमध्ये किंमतीत किरकोळ फरक आहे.
उदाहरणार्थ, Stealth Grey रंगाच्या RWD Model Y ची किंमत मुंबईत 61,07,190 रुपये आहे, तर दिल्लीत 61,06,690 रुपये. Long Range व्हेरियंटमध्येही साधारण एक ते दोन हजार रुपयांचा फरक दिसतो.
EMI आणि बुकिंग डिटेल्स
जर दिल्लीत Tesla Model Y RWD खरेदी करायची असेल, तर सुमारे 1.14 लाख रुपये मासिक EMI द्यावी लागणार आहे. तर Long Range व्हेरियंटसाठी हा EMI 1.29 लाख रुपये पर्यंत जाईल. किमान 6.1 लाख रुपये डाउन पेमेंट आणि 9% APR व्याजदर मानून ही गणितं मांडली गेली आहेत.
बुकिंगसाठी केवळ 22,220 रुपये इतकं टोकन अमाऊंट भरावं लागणार आहे.
Tesla Experience Centre : जागतिक दर्जाचं प्रदर्शन भारतात
मुंबईत उभारलेलं Tesla Experience Centre हे टेस्लाच्या जागतिक दर्जाच्या डिझाईनशी सुसंगत असून, साध्या पांढऱ्या रंगाच्या थीममध्ये सजलेलं आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रेरणेतून तयार करण्यात आलेले व्हिज्युअल्स आणि टेस्लाच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळते. या संपूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व नीता शरडा यांनी केलं आहे.
सामान्य ग्राहकांच्या प्रतिक्रिया : हास्य आणि टीका
टेस्लाची भारतातील किंमत पाहून अनेकांनी सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी म्हटलं, “Tesla नव्हे तर TAX-LA म्हणायला हवं!” तर काहींनी सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या कर रकमेवर नाराजी व्यक्त केली. काहींनी सांगितलं, “इथे गाडीच्या किमतीपेक्षा अर्धं जास्त पैसे कर म्हणून द्यावे लागतात.”
हे पण वाचा ..New Honda City चा स्पोर्टी अवतार लवकरच लॉन्च होणार; होंडाचा खास टीझर चर्चेत
टेस्लाचा पुढचा टप्पा : मॅन्युफॅक्चरिंग भारतात?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उद्घाटनप्रसंगी सांगितलं की, भारत सरकारला केवळ विक्री नव्हे तर संशोधन आणि उत्पादन या स्तरावरही टेस्लाने भारतात गुंतवणूक करावी अशी अपेक्षा आहे. भविष्यात टेस्लाने याचा नक्कीच विचार करावा, असं ते म्हणाले.
Tesla Model Y : रंग पर्याय आणि व्हेरियंट्स
Tesla Model Y दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे — RWD आणि Long Range RWD. एकूण सहा रंग पर्याय आहेत — Stealth Grey, Pearl White Multi-Coat, Diamond Black, Glacier Blue, Quicksilver आणि Ultra Red. काही रंगांसाठी अतिरिक्त चार्जही आकारला जातो.
Tesla Model Y Price in India या निमित्ताने भारतातील EV बाजार आता आणखी रंगतदार होणार हे निश्चित! Elon Musk आणि Tesla च्या या प्रवासात भारतीय ग्राहक आणि स्पर्धक कंपन्यांचा प्रतिसाद पाहणं औत्सुक्याचं ठरेल.