ADVERTISEMENT

तुझा बाप कोण?”; कमळीच्या आईच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह, नयनताराच्या अपमानानंतर हृषीसमोर उभा राहिला मोठा पेच

kamali aai var aakshep nayantaracha apman hrishi prem kabuli : 'कमळी' मालिकेत भावनिक वळण; नयनताराने भरगावात कमळी व तिच्या आईचा अपमान केल्यानंतर हृषीने प्रेमाची कबुली देत तिला मुंबईला येण्याची विनंती केली. मात्र कमळीने स्वाभिमानाचा मार्ग निवडत मोठा निर्णय घेतला आहे
kamali aai var aakshep nayantaracha apman hrishi prem kabuli

kamali aai var aakshep nayantaracha apman hrishi prem kabuli : ‘कमळी’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना प्रचंड भावनिक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. हृषी आणि कमळीच्या नात्याला नव्याने आकार मिळत असतानाच नयनताराच्या आगमनामुळे दोघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं वादळ निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये कमळी व तिच्या आईचा भरगावात झालेला अपमान पाहून प्रेक्षकही भावुक झाले आहेत.

गेल्या काही भागांमध्ये हृषीने मुंबईतील आयुष्य मागे सोडून कोल्हापुरात वास्तव्यास राहण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. कमळीने तिचं शिक्षण पूर्ण करावं, आयुष्यात पुढे जावं आणि पुन्हा एकदा मुंबईत परत यावं, अशी त्याची मनापासून इच्छा आहे. यासोबतच कमळीबद्दलच्या आपल्या प्रेमाची जाणीवही हृषीला अधिक स्पष्टपणे होताना दिसते. मात्र हृषी आणि कमळी यांचं नातं कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ नये, असा निर्धार अनिकाने केलेला असतो. त्यामुळे ती थेट कोल्हापुरात पोहोचते.

हृषी गावात कशा परिस्थितीत राहत आहे, याचे फोटो अनिका नयनताराकडे पाठवते. त्यातच रोहितदेखील नयनताराच्या मनात शंका निर्माण करतो. त्यामुळे संतापलेल्या नयनतारा कोल्हापुरात येण्याचा निर्णय घेते. त्याचवेळी कमळी आणि हृषी एकमेकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करत असतात. दोघेही प्रेमाची कबुली देत असताना अचानक नयनताराची एन्ट्री होते आणि वातावरण तणावपूर्ण बनते.

कमळीला हृषीसोबत पाहताच नयनतारा संताप व्यक्त करते. इनामदार घराण्याची सून होण्याची पात्रता कमळीमध्ये नसल्याचं सांगत ती थेट तिच्या वडिलांविषयी प्रश्न उपस्थित करते. याचवेळी कमळीची आई तेथे पोहोचते. मात्र परिस्थिती आणखी चिघळत जाते. साधना म्हणून ओळख निर्माण करून इनामदारांच्या घरात राहिल्याचा मुद्दा काढत नयनतारा तिच्यावर गंभीर आरोप करते आणि कमळीच्या जन्माबाबतही अपमानास्पद वक्तव्य करते.

आपल्या आईच्या चारित्र्यावर सार्वजनिकरित्या बोट ठेवल्याचं पाहून कमळी पूर्णपणे कोसळते. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटतात. हृषी तिची समजूत घालत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देतो आणि तिला स्वतःसोबत येण्यास सांगतो. मात्र कमळी स्वाभिमानाने निर्णय घेत स्पष्ट शब्दांत सांगते की, ज्या दिवशी नयनतारा स्वतःहून तिला स्वीकारेल, त्याच दिवशी ती हृषीसोबत जाण्याचा विचार करेल.

हे पण वाचा.. कमळीच्या सेटवरील अनिकाचा अंगावर शेण-चिखल उडाल्याचा सीन ऑफस्क्रीन कसा झाला शूट? BTS व्हिडीओ व्हायरल

kamali aai var aakshep nayantaracha apman hrishi prem kabuli

दरम्यान, नयनतारा हृषीला पुन्हा मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचंही दिसत आहे. दुसरीकडे, अनिकाच्या व्हिडीओ कॉलमुळे कामिनीसमोर कमळीच्या खरी ओळखीचं गुपित उलगडल्याची माहिती समोर आली आहे. कमळी ही गौरी आणि राजन यांची मुलगी तसेच महाजन कुटुंबाची मोठी नात असल्याचं सत्य आता अनेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ आणि १९ जून रोजी प्रसारित होणाऱ्या विशेष भागांमध्ये नेमकं काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. मीच खरी तन्वी आहे का?” मधुभाऊंच्या एका इशाऱ्याने उलगडलं मोठं रहस्य; ‘ठरलं तर मग’मध्ये अखेर सत्य समोर