ADVERTISEMENT

अक्षय केळकरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पत्नीला दिलं ड्रीम होम गिफ्ट

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift : अभिनेता अक्षय केळकरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी साधना काकतकरला खास सरप्राईज देत मुंबईत नव्या ड्रीम होमचा गृहप्रवेश केला असून, या आनंददायी क्षणांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण यावेळी चर्चा आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाच्या क्षणांची. अक्षयने मुंबईत आपलं दुसरं हक्काचं घर घेतलं असून, हे घर त्याने थेट पत्नी साधना काकतकरला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट म्हणून दिलं आहे.

अक्षयने काही वर्षांपूर्वी मुंबईत आपलं पहिलं घर मिळवलं होतं, जे म्हाडा लॉटरीतून त्याच्या नशिबी आलं होतं. मात्र आता त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि यशाच्या प्रवासात आणखी एक मोठं पाऊल टाकत मुंबईत दुसरं घर खरेदी केलं आहे. हे घर त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

अक्षय आणि साधना यांचं लग्न ९ मे २०२५ रोजी झालं होतं. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच या जोडप्याने नव्या घरात गृहप्रवेश केला. या खास प्रसंगी साधना काकतकरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. तिने लिहिलं की, मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर घेणं कधीच सोपं नसतं, पण अक्षयने हे स्वप्न वास्तवात उतरवलं. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी त्याने तिला हे ड्रीम होम गिफ्ट दिल्याने हा क्षण तिच्यासाठी अधिक खास ठरला.

साधनाने आपल्या पोस्टमध्ये अक्षयच्या साथीसाठी, त्याच्या आधारासाठी आणि तिच्या आयुष्यातील बदलासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. तिने अक्षयला आपला खंबीर आधारस्तंभ म्हणत त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व अपूर्ण असल्याचंही नमूद केलं.

यावर अक्षयनेही प्रेमळ प्रतिक्रिया देत पत्नीचं स्वप्न पूर्ण करणं हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं समाधान असल्याचं सांगितलं. भविष्यात दोघं मिळून आणखी मोठी स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

हे पण वाचा.. विशाल निकम व अक्षया हिंदळकरची गोवा सफर; रोमँटिक फोटो व्हायरल

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift

दरम्यान, या नव्या घरातील गृहप्रवेश सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, मराठी कलाकार आणि चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अक्षय केळकरचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. राज मोरेचा फिटनेस मंत्र; पालेभाज्या, ताक आणि साध्या आहारातून ५ किलो वजन घटवलं