ADVERTISEMENT

आर्या आंबेकरची ‘कमळी’ मालिकेत दमदार एन्ट्री; हृषीच्या आयुष्यात नवा ट्विस्ट

aarya ambekar kamali malika entry twist :लोकप्रिय गायिका "आर्या आंबेकर" आता 'कमळी' मालिकेत अनामिका या भूमिकेत झळकणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे हृषीच्या आयुष्यात नवा वळण येणार असून मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
aarya ambekar kamali malika entry twist

aarya ambekar kamali malika entry twist : मराठी मालिकांच्या विश्वात सध्या ‘कमळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून मुंबईत आलेल्या कमळीच्या संघर्षमय प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. तिच्या आयुष्यात सतत येणाऱ्या अडचणी, नाती-गोती आणि स्वप्नांचा पाठपुरावा या सगळ्यामुळे ही कथा अधिकच रंगतदार बनली आहे.

कमळी आणि अनिका यांच्यातील वाद मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अनिकाला कमळीबद्दल असलेली नाराजी आणि तिच्याकडून होणारे त्रास यामुळे कथानकाला वेगळाच रंग चढला आहे. तरीही कमळीच्या पाठीशी तिची मैत्रीण निंगी, हृषी आणि अन्नपूर्णा आजी ठामपणे उभे राहिलेले दिसतात.

याच दरम्यान हृषीच्या मनात कमळीबद्दल भावना निर्माण झाल्याचेही संकेत मिळत आहेत. मात्र त्याने अजूनही आपल्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत. दुसरीकडे त्याच्या आईकडून त्याच्यासाठी स्थळे पाहण्याची घाई सुरू आहे. त्यामुळे हृषीच्या आयुष्यात पुढे काय होणार, याची उत्सुकता आधीच वाढलेली होती.

आता या सगळ्या घडामोडींमध्ये एक नवीन वळण येत आहे. “Aarya Ambekar” हिची मालिकेत एन्ट्री होत असून ती अनामिका या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तिची झलक पाहायला मिळते. एका गाडीतून उतरताच तिच्या आगमनाची चर्चा कॉलेजमध्ये सुरू होते. ती म्युझिक टीचर असल्याचे सांगितले जाते आणि तिच्या गाण्याबद्दल कौतुकही ऐकायला मिळते.

प्रोमोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजे अनामिकाने हृषीला विचारलेला प्रश्न – “मी आवडले का?” हा संवाद ऐकताच हृषी पूर्णपणे गोंधळून जातो. पुढे अनामिका स्वतःच स्पष्ट करते की ती फक्त शिकवण्यासाठी नाही, तर लग्नासाठी मुलगा पाहण्यासाठीही आली आहे. या संवादामुळे मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे स्पष्ट होते.

हे पण वाचा.. जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य: “राकेश प्रचंड तापट”, बिग बॉस मराठी 6वर स्पष्ट मत

aarya ambekar kamali malika entry twist

विशेष म्हणजे “Aarya Ambekar” ही लोकप्रिय गायिका असल्यामुळे तिची एन्ट्री प्रेक्षकांसाठी मोठा सरप्राईज ठरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले जात आहे. “सुंदर एन्ट्री”, “धमाकेदार ट्विस्ट”, “आवडती गायिका आता मालिकेत” अशा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हे पण वाचा.. हनुमान जयंतीला आनंदाची बातमी! आशिष पाथोडे झाला बाबा, घरी मुलाचा जन्म

अनामिकाच्या आगमनामुळे हृषी आणि कमळीच्या नात्यावर काय परिणाम होणार, तसेच पुढील भागात कोणते नवे वळण येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. “Aarya Ambekar” च्या या एन्ट्रीमुळे ‘कमळी’ मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे, हे मात्र नक्की.