ADVERTISEMENT

राकेश बापट आणि राखी सावंत मध्ये मोठा वाद!

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight : बिग बॉस मराठी ६ च्या घरात Rakesh Bapat Rakhi Sawant Fight मुळे वातावरण तापलं आहे. राकेश आणि राखी यांच्यातील वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight : बिग बॉस मराठी च्या घरात सध्या वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे Rakesh Bapat Rakhi Sawant Fight हा मुद्दा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी घरात राकेश बापट आणि विशाल कोटीयन यांच्यात जोरदार वाद आणि धक्काबुक्की झाली होती, ज्यामुळे बिग बॉसने दोघांनाही शिक्षा दिली होती. त्या घटनेनंतरही घरातील वातावरण शांत न होता आणखी तापताना दिसत आहे.

विशालने राकेशवर वयावरून टोमणे मारल्याचा आरोप केला होता, तर प्रत्युत्तरात राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करण्यात आले. यामुळे वाद अधिकच चिघळला. या सगळ्यात राखी सावंतचे नाव पुढे आले. विशालने सांगितले की राकेशने त्याच्या वयाबद्दल काही गोष्टी राखीकडून ऐकल्या, पण जेव्हा राकेशने राखीकडे याबाबत विचारणा केली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे राकेशचा तिच्यावर राग वाढल्याचे दिसून आले.

नवीन एपिसोडमध्ये हा वाद आणखी उफाळून येताना दिसतो. बेडरूममध्ये राखी मेकअप करत असताना राकेश तिच्याशी थेट भिडतो. राखी दावा करते की राकेशने तिला सांगितले होते की त्याला हा रिअॅलिटी शो करायचा नव्हता आणि त्याला जबरदस्ती आणले गेले. या आरोपावरून घरातील इतर सदस्यांनी राखीला विरोध केला.

वाद वाढत असताना राकेश संतापून तिथून निघून जातो, मात्र दोघांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरूच राहते. परिस्थिती इतकी गंभीर बनते की राकेश संतापाच्या भरात पुढे जाऊन राखीकडे धाव घेतो. त्यावेळी घरातील काही सदस्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. राखीही त्याला सतत उचकावत असल्याचे चित्र दिसते.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये नॉमिनेशनवरून घरात रंगला वाद, तन्वीच्या निर्णयावर अनुश्री भडकली!

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight

या Rakesh Bapat Rakhi Sawant Fight मुळे घरातील गटांमध्येही तणाव निर्माण झाला आहे. काही सदस्य हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना काही जण दूर राहून परिस्थिती पाहत आहेत. पुढे हा वाद कुठपर्यंत जाईल, तसेच राखी आपला गट बदलणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा राडा! राकेश बापट विशाल कोटियन मध्ये होणार