ADVERTISEMENT

कमळी: रामनवमीला राजन-सरोजची भावनिक भेट; मुलीबद्दलचं सत्य अजूनही दडलेलं

Kamali Promo rajna saroj bhet ramnavmi twist : ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! अनेक वर्षांनंतर रामनवमीच्या दिवशी राजन आणि सरोज आमनेसामने येतात, पण मुलगी ‘कमळी’बद्दल सरोज देणार धक्कादायक उत्तर.
Kamali Promo rajna saroj bhet ramnavmi twist 

Kamali Promo rajna saroj bhet ramnavmi twist  : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाट्य पाहायला मिळत आहे. Kamali Promo समोर आल्यानंतर आता मालिकेच्या कथानकात मोठा बदल घडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक अडचणींना तोंड देत कमळी महाजन कुटुंबात प्रवेश करते, मात्र तिच्यासाठी हा प्रवास अजूनही खडतर ठरत आहे.

कमळीच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठं संकट म्हणजे अनिका. ती कमळीविरोधात सातत्याने कट रचत असून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय. विशेष म्हणजे, अनिका कमळीसारखाच दिसणारा लूक तयार करून तिच्या नावावर चुकीची कृत्यं करत आहे. त्यामुळे घरच्यांसमोर आणि समाजात कमळीची प्रतिमा खराब होत चालली आहे. अगदी सीसीटीव्ही फुटेजमध्येही कमळीच चुकीची असल्याचा आभास निर्माण होतोय, ज्यामुळे तिच्यासाठी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.

या सगळ्या गोंधळात मात्र एक भावनिक आणि महत्त्वाचा प्रसंग घडणार आहे. कमळीचे आई-वडील, म्हणजेच सरोज (गौरी) आणि राजन, अनेक वर्षांनी एकमेकांसमोर येणार आहेत. Kamali Promo मध्ये दाखवलेल्या दृश्यांनुसार, रामनवमीच्या शुभदिनी मंदिरात ही भेट घडते. सरोज प्रसाद वाटत असताना अचानक तिची नजर राजनवर पडते आणि ती घाबरून दूर जाण्याचा प्रयत्न करते. पण नियतीला काही वेगळंच मान्य असतं.

राजन तिचा मार्ग अडवतो आणि अनेक वर्षांचा विरह एकाच क्षणात डोळ्यांसमोर उभा राहतो. दोघांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात. मात्र या भावनिक क्षणातही सरोज स्वतःला सावरते. ती आपली खरी ओळख आणि कमळीबद्दलचं सत्य लपवण्याचा निर्णय घेते. राजन जेव्हा त्यांच्या मुलीबद्दल विचारतो, तेव्हा सरोज त्याला धक्कादायक उत्तर देते – “आपली मुलगी आता या जगात नाही.”

हे ऐकून राजनचा विश्वास बसणार का? हा प्रश्न आता प्रेक्षकांना सतावत आहे. दुसरीकडे, कमळीवर कॉलेजमधील चोरीच्या प्रकरणात आरोप होणार आहेत. मुख्याध्यापकही तिच्याकडे जाब विचारतात. अशा परिस्थितीत कमळी अनिकाचं खरं रूप सगळ्यांसमोर कसं आणणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. लक्ष्मी निवास: “जयंत कानेटकर” चं सत्य उघड होणार? जान्हवीसमोर भूतकाळातील घटनांचा धक्कादायक खुलासा

Kamali Promo rajna saroj bhet ramnavmi twist

एकूणच, Kamali Promo ने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. पुढील भागांमध्ये कमळीचं आयुष्य कोणत्या वळणावर जाणार आणि तिचं कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. तारिणी’मध्ये धक्कादायक वळण! ‘तो’ नराधम अखेर समोर, दयानंद खांडेकरांचा खरा चेहरा उघड