bai tuza ashirvad star cast update : मराठी मनोरंजन विश्वात सध्या Bai Tuza Ashirvad या नव्या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आणि त्यानंतरपासूनच या मालिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली. नवीन कथा, वेगळी मांडणी आणि ताज्या कलाकारांची फौज यामुळे Bai Tuza Ashirvad ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली.
सुरुवातीला या मालिकेचं प्रसारण ३० मार्चपासून रात्री ९ वाजता होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, मालिकेच्या ऑनएअर होण्यापूर्वीच वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. Bai Tuza Ashirvad आता नियोजित वेळेपेक्षा उशिरा, म्हणजेच रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. तसेच या मालिकेची नवी लॉन्च तारीख २० एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.
या बदलामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी उत्सुकता आणि थोडा संभ्रमही निर्माण झाला आहे. कारण प्राइम टाइम स्लॉटमधील हा बदल इतर मालिकांवरही परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे, Bai Tuza Ashirvad सोबतच ‘आनंदी’ ही आणखी एक नवी मालिका ९:३० वाजता दाखवली जाणार असल्याने सध्याच्या मालिकांच्या वेळापत्रकात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Bai Tuza Ashirvad या मालिकेची कथा एका अशा घराभोवती फिरते, जिथे स्त्रीच्या अस्तित्वाला फारशी जागा नाही. पूर्णपणे पुरुषप्रधान वातावरणात अवनी नावाच्या मुलीचं आगमन होतं आणि तिथून पुढे नात्यांची गुंतागुंत, बदल आणि नव्या भावना उलगडत जातात. तिच्या येण्यामुळे त्या घराला एक वेगळंच ‘घरपण’ लाभतं. या प्रवासात धनराज आणि अवनी यांच्यातील नातं कसं आकार घेतं, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद आणि अभिनेता अर्णव वॅरिअर दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला सुनील तावडे, पुष्कर सरद, सतीश तांदळे, राघव वर्तक, शरद पोंक्षे आणि सीमा घोगळे यांसारखे अनुभवी कलाकारही झळकणार आहेत. या दमदार कलाकारांमुळे Bai Tuza Ashirvad मालिकेची ताकद आणखी वाढली आहे.
हे पण वाचा .. साधी माणसं मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; दोन वर्षांचा प्रवास संपताना सेटवर भावुक क्षण
bai tuza ashirvad star cast update
मालिकेची निर्मिती पोतडी या निर्मिती संस्थेकडून करण्यात आली असून दिग्दर्शनाची जबाबदारी विनोद लव्हेकर सांभाळत आहेत. लेखनाची धुरा अमोल पाटील यांनी उचलली आहे.
हे पण वाचा.. लग्नानंतर होईलच प्रेम : पार्थच्या युक्तीने काव्याचा आत्मविश्वास परत, तर रम्याच्या मनात नवा डाव
एकूणच, वेळ आणि तारीख बदलूनही Bai Tuza Ashirvad या मालिकेबाबतची उत्सुकता कमी झालेली नाही, उलट नव्या वेळेमुळे प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. आता २० एप्रिलपासून रात्री १० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ती प्रेक्षकांच्या मनात किती घर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.









