tharala tar mag asmitacha tham nirnay sachin navi kheli : ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत सध्या घडणाऱ्या घटनांनी कथानकाला नवा कलाटणी दिला आहे. 23 मार्च 2026 च्या भागात नात्यांमधील गुंतागुंत आणि प्रत्येक पात्राच्या मनातील भावना अधिक स्पष्टपणे समोर येताना दिसतात.
या भागाची सुरुवात प्रिया आपल्या नेहमीच्या चतुर डावाने करते. सायली आणि अर्जुन यांना सत्यापासून दूर ठेवण्यासाठी ती त्यांना घरातच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करते. सायलीची अवस्था पाहून प्रियाला समाधान मिळत असते. दरम्यान, अस्मिता बाहेर येते आणि चैतन्य तिच्यासमोर घटस्फोटाचे कागद ठेवतो. सायलीने विरोध केला असतानाही अर्जुन हे पाऊल उचलतो, ज्यामुळे अस्मिताचा संताप अनावर होतो.
अस्मिता स्पष्ट शब्दांत सांगते की, कोणत्याही परिस्थितीत ती सचिनला घटस्फोट देणार नाही. नवऱ्याविषयीचे तिचे प्रेम अजूनही कायम असल्याचे ती ठामपणे व्यक्त करते. मात्र, सायलीने तिच्या वैयक्तिक गोष्टी अर्जुनला सांगितल्यामुळे ती तिच्यावरही नाराज होते. यामुळे सायली आणि अर्जुनमध्येही तणाव निर्माण होतो. सायली अर्जुनला सुनावते की, अशा वैयक्तिक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही.
यानंतर सायली अर्जुनला वंदना देशमुखचा शोध घेण्यासाठी पाठवते. अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्याबद्दल माहिती मिळवतो आणि पुढील तपासासाठी निघतो. दुसरीकडे, घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होत असताना सायलीला आजीकडून मंदिरात जाण्याचा सल्ला मिळतो. मंदिरात सायली देवीसमोर प्रार्थना करताना घरावर आलेल्या संकटांपासून सुटका व्हावी, तसेच सचिन आणि प्रियाचे खरे चेहरे समोर यावेत, अशी मनोमन इच्छा व्यक्त करते. तिच्या प्रार्थनेला सकारात्मक संकेत मिळाल्याने तिचा आत्मविश्वास वाढतो.
दरम्यान, कथानकाचा दुसरा महत्त्वाचा भाग सचिन आणि साक्षीभोवती फिरतो. सचिन साक्षीला त्यांच्या गोडाऊनमध्ये घेऊन जातो आणि तिला दूर राहण्याचा सल्ला देतो. मात्र, तो अस्मितेकडे परत जाण्याची तयारी दाखवतो, कारण त्याला तिच्याकडून पैसे वसूल करायचे असतात. साक्षीसमोर तो प्रेम व्यक्त करत असला, तरी त्याच्या मनात वेगळीच योजना सुरू असल्याचे दिसते.
हे पण वाचा .. द ५०’चा बादशाह शिव ठाकरे ! ५० लाख जिंकून चाहत्याला दिली मोठी भेट
साक्षी निघून गेल्यानंतर सचिन स्वतःलाच दुखापत करून घेतो आणि मुद्दाम फोनचे लोकेशन सुरू ठेवतो. यामुळे अर्जुनला त्याचा ठावठिकाणा कळतो आणि तो पोलिसांसह त्या ठिकाणी पोहोचतो. पोलिसांचा आवाज ऐकताच सचिन बेशुद्ध पडल्याचे नाटक करतो, ज्यामुळे पुढील घटनांमध्ये आणखी मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tharala Tar Mag मालिकेत आता सत्य उघडकीस येईल का, आणि सायली-अर्जुन यांचे प्रयत्न यशस्वी ठरतील का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग : अस्मिताने पुन्हा घेतली सचिनची बाजू, सायलीच्या प्रश्नाने अर्जुन गप्प









