ADVERTISEMENT

ठरलं तर मग : अस्मिताने पुन्हा घेतली सचिनची बाजू, सायलीच्या प्रश्नाने अर्जुन गप्प

tharala tar mag asmita sachin baju sayali arjun prashna : ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट! अस्मिता पुन्हा नवऱ्याच्या बाजूने उभी राहताना दिसतेय, तर सायलीच्या थेट प्रश्नामुळे अर्जुनची बोलती बंद झाली आहे.
tharala tar mag asmita sachin baju sayali arjun prashna

tharala tar mag asmita sachin baju sayali arjun prashna : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या घडामोडींनी वेग घेतला असून प्रत्येक भागात नवा धक्का प्रेक्षकांना मिळताना दिसतोय. अलीकडील भागात सायलीसमोर काही धक्कादायक सत्य उघडकीस आले आणि त्यानंतर संपूर्ण सुभेदार कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायलीला काही दिवसांपूर्वी सचिन एका कॅफेमध्ये साक्षीसोबत दिसतो. या घटनेनंतर तिच्या मनातील शंका अधिकच पक्क्या होतात. सचिन अजूनही आपल्या चुकीच्या सवयींमधून बाहेर पडलेला नाही, हे स्पष्ट होते. त्याचबरोबर साक्षी जिवंत असल्याचेही उघड होते, ज्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते. विशेष म्हणजे, साक्षीचा संबंध आधीपासूनच सुभेदार कुटुंबासाठी त्रासदायक ठरलेला आहे.

हे सर्व सत्य समोर आल्यानंतर अस्मितालाही मोठा धक्का बसतो. तिची तब्येत बिघडून ती बेशुद्ध पडते, ज्यामुळे घरातील सगळेच घाबरून जातात. मात्र सुदैवाने कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होत नाही आणि अस्मिता तसेच तिचं बाळ सुरक्षित असल्याचं स्पष्ट होतं. यानंतर अस्मिताचं बाळासह सुभेदारांच्या घरात आगमन होतं.

पूर्वीपासूनच अस्मिता सायलीविरोधात भूमिका घेताना दिसत होती आणि प्रियासोबत तिची जुळलेली हातमिळवणीही सर्वांनी पाहिली होती. आता पुन्हा एकदा ती त्याच मार्गावर चालताना दिसते. बाळाच्या निमित्ताने घरात आलेली अस्मिता, सायली आणि अर्जुनच्या विरोधात उभी राहताना दिसते.

दरम्यान, सचिन बाळाला पाहण्यासाठी घरी येतो. त्या वेळी अर्जुन त्याला थांबवतो आणि त्याच्या वागण्याबद्दल प्रश्न उपस्थित करतो. मात्र या वादात अस्मिता हस्तक्षेप करते आणि ठामपणे सचिनची बाजू घेते. तिचा नवऱ्यावर असलेला विश्वास ती सर्वांसमोर व्यक्त करते, जरी परिस्थिती तिच्याविरोधात असली तरी.

हे पण वाचा .. द ५०’चा बादशाह शिव ठाकरे ! ५० लाख जिंकून चाहत्याला दिली मोठी भेट

सायली आणि अस्मितामधील संवाद यावेळी विशेष लक्षवेधी ठरतो. अस्मिता सायलीला विचारते की, जर तिचा नवरा खोटं बोलला असता, तर ती त्याला माफ केलं असतं का? यावर सायली ठामपणे नकार देते आणि नात्यातील प्रामाणिकपणाला ती किती महत्त्व देते, हे स्पष्ट करते.

या सगळ्या घडामोडींनंतर आणखी एक महत्त्वाचा प्रसंग समोर येतो. अर्जुन सायलीला विचारतो की, काही गोष्टी जर तिच्यापासून लपवाव्या लागल्या, तर ती नातं तोडेल का? या प्रश्नावर सायली उलट अर्जुनलाच विचारते की, तो तिच्यापासून काही लपवत आहे का? हा थेट प्रश्न ऐकून अर्जुन क्षणभर गप्प होतो.

हे पण वाचा.. स्वामी समर्थ मालिकेत मोठा बदल; अक्षय मुदावडकरचा निरोप, आता सुनील गोडसे साकारणार भूमिका

tharala tar mag asmita sachin baju sayali arjun prashna

आता पुढे काय होणार, अर्जुन सायलीला खरं सांगणार का, आणि सचिनबाबत सुभेदार कुटुंब काय निर्णय घेणार, याकडे ‘Tharala Tar Mag’च्या प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.