ADVERTISEMENT

बिग बॉस मराठी शोचं नाव बदलून ‘तन्वी शो’ ठेवा, प्रेक्षकांचा सवाल

bigg boss marathi 6 tanvi kautuk prakshak naraji : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने तन्वीच्या खेळाचं कौतुक केल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. सोशल मीडियावर ‘विनर फिक्स’ असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
bigg boss marathi 6 tanvi kautuk prakshak naraji

bigg boss marathi 6 tanvi kautuk prakshak naraji : बिग बॉस मराठी ६ चा सध्या दहावा आठवडा सुरू असून घरातील घडामोडींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. अलीकडेच राखी सावंत, संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं बदलली. काही स्पर्धकांच्या एलिमिनेशनमुळे प्रेक्षकांमध्ये आधीच नाराजी होती, त्यात आता नव्या प्रोमोने आणखी वाद निर्माण केला आहे.

कलर्स मराठीकडून नुकताच ‘भाऊचा धक्का’चा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये होस्ट रितेश देशमुख हा स्पर्धक तन्वी कोलतेच्या खेळाबद्दल बोलताना दिसतो. एका टास्कदरम्यान तन्वीने दाखवलेल्या आक्रमक आणि ठाम भूमिकेचं तो कौतुक करताना दिसतो. टास्कमध्ये सुरुवातीला एकतर्फी निकाल लागेल असं वाटत असतानाही तन्वीने हार न मानता परिस्थिती आपल्या बाजूने वळवली, याचा उल्लेख रितेशनं केला.

तन्वीने स्वतःही खेळात ‘फेअर गेम’ खेळण्याची भूमिका मांडली होती. व्हिक्टीम कार्ड न वापरता ती स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवत खेळतेय, असं चित्र या प्रोमोमधून दिसतं. मात्र, रितेश देशमुख वारंवार तिचं कौतुक करत असल्याचं पाहून प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर या प्रोमोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी या गोष्टीवर उघड नाराजी व्यक्त करत, शोमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप केला आहे. ‘भाऊचा धक्का’ ऐवजी ‘तन्वीचा शो’ असं नाव ठेवा, अशा टोमणेबाज कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. काहींनी तर थेट ‘Bigg Boss Marathi 6’ चा विजेता आधीच ठरलेला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, याआधी आठव्या आठवड्यात रुचिता जामदारच्या एलिमिनेशनवरूनही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता सलग घडणाऱ्या या घटनांमुळे शोच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे पण वाचा.. हिऱ्याच्या चोरीचं सत्य समोर; मैत्रीतला गैरसमज दूर होणार का?

bigg boss marathi 6 tanvi kautuk prakshak naraji

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर संस्कृती साळुंकेच्या एलिमिनेशनबाबत चर्चा रंगत आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसून पुढील ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्येच नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. हिरवी साडी आणि स्टायलिश कुर्ता; ‘तू ही रे माझा मितवा’ जोडीचा मराठमोळा लूक व्हायरल

एकंदरीत, Bigg Boss Marathi 6 मध्ये स्पर्धकांचा खेळ जितका रंगत चाललाय, तितकाच प्रेक्षकांचा प्रतिसादही तीव्र होताना दिसतोय. पुढील भागांमध्ये या नाराजीचं काय रूपांतर होतं आणि खरोखरच खेळात काही बदल दिसतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.