ADVERTISEMENT

प्रिया खरी तन्वी नाहीच…! अखेर ३ वर्षांनी ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट, ‘बबली लोखंडे’ची ओळख उघड; अर्जुन-सायलीसमोर आलं सत्य

tharala tar mag priya khari olakh babli lokhande : लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag मध्ये प्रेक्षक ज्या मोठ्या ट्विस्टची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे. अर्जुन-सायलीसमोर प्रियाची खरी ओळख उघड होणार असून ती खरी तन्वी नसल्याचा मोठा खुलासा मालिकेत होणार आहे.
tharala tar mag priya khari olakh babli lokhande

tharala tar mag priya khari olakh babli lokhande : मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली Tharala Tar Mag ही मालिका सध्या एका मोठ्या वळणावर येऊन ठेपली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेत प्रियाच्या व्यक्तिरेखेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. प्रिया खरंच तन्वी आहे का? या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. Tharala Tar Mag च्या नव्या प्रोमोमुळे मालिकेत मोठा खुलासा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मालिकेच्या कथेनुसार प्रिया अनेक वर्षांपासून सुभेदारांच्या घरात तन्वी असल्याचं भासवत राहते. प्रत्यक्षात ती रविराज आणि प्रतिमाची खरी मुलगी नसल्याचं काही काळापूर्वी मधुभाऊंना समजलं होतं. मात्र हे सत्य उघड होण्याआधीच नागराज मधुभाऊंवर हल्ला करतो आणि ते कोमात जातात. त्यामुळे प्रियाबाबतचं खरं रहस्य अजून काही काळ गुपितच राहतं. Tharala Tar Mag मधील ही गोष्ट प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी ठरली होती.

दरम्यान सायलीला प्रियाच्या हालचालींवर आधीपासूनच संशय असतो. ती तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असते. अशाच एका प्रसंगात प्रिया गोड बोलून अश्विनकडून पैसे घेते आणि ते पैसे थेट सदा आणि मैनाच्या घरी देण्यासाठी जाते. हा प्रकार पाहून सायलीच्या मनात शंका निर्माण होते. प्रिया निघून गेल्यानंतर सायली सदा-मैनाला थेट प्रश्न विचारते आणि त्यानंतर ही गोष्ट अर्जुनपर्यंत पोहोचते.

हे पण वाचा.. रुचिता गेल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुफान वाद! राखी-विशाल आमनेसामने

यानंतर कथानकाला आणखी वेग येतो. सदा आणि मैनाने त्यांच्या पाचव्या मुलीला पैशांसाठी विकल्याचं धक्कादायक सत्य समोर येतं. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली पुढचा तपास करण्यासाठी शाळेत जातात. तिथे जुन्या रजिस्टरमध्ये एक फोटो दिसतो आणि त्यासोबत लिहिलेलं नाव सगळ्यांनाच थक्क करून टाकतं. त्या रजिस्टरमध्ये ‘बबली सदा लोखंडे’ असं नाव असतं आणि फोटो देखील प्रियाचाच असतो.

ही माहिती पाहिल्यानंतर अर्जुन आणि सायलीला खात्री पटते की प्रिया ही खरंतर तन्वी नसून बबली लोखंडे आहे. Tharala Tar Mag मधील हा मोठा ट्विस्ट कथानकाला पूर्णपणे नवीन दिशा देणार आहे. आता अर्जुन-सायली सुभेदार कुटुंबीयांना हे सत्य कसं सांगणार, तसेच खरी तन्वी नक्की कोण आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

Tharala Tar Mag च्या या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “अखेर सत्य बाहेर येणार”, “आता प्रियाचा खेळ संपणार” अशा कमेंट्स करत मालिकेचं कौतुक केलं आहे. काही प्रेक्षकांनी तर अर्जुन आणि सायली आता प्रियाला चांगलंच धडा शिकवतील अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा.. रुचिता जामदारसाठी भावाची भावूक पोस्ट; म्हणाला – “ट्रॉफी नाही, लोकांच्या प्रेमानेच तू जिंकलीस”

tharala tar mag priya khari olakh babli lokhande

सध्या Tharala Tar Mag ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरली असून तिचा प्रत्येक भाग चर्चेत असतो. येणाऱ्या भागात उलगडणाऱ्या या रहस्यामुळे मालिकेची उत्सुकता आणखी वाढणार आहे. त्यामुळे पुढील भागांमध्ये नेमकं काय घडणार आणि खरी तन्वी कोण आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.