bigg boss marathi 6 ruchita jamdar elimination : बिग बॉस मराठी 6 चा आठवा आठवडा संपताना घरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढली होती. अखेर या आठवड्याच्या एलिमिनेशनमध्ये मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार Ruchita Jamdar हिला घराबाहेर पडावं लागलं असल्याचं समोर येत आहे.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामध्ये तन्वी कोलते, प्रभू शेळके, Ruchita Jamdar, सागर कारंडे, संस्कृती साळुंखे, प्राजक्ता शुक्रे आणि दिपाली सय्यद या सदस्यांचा समावेश होता. नॉमिनेशननंतर सर्व स्पर्धकांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यामुळे कोण सुरक्षित राहणार आणि कोण घराबाहेर जाणार याबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते.
वोटिंग ट्रेंडनुसार तन्वी कोलते पहिल्या स्थानावर असल्याचं सांगितलं जात होतं. तिच्यानंतर Ruchita Jamdar दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली होती. तिसऱ्या स्थानावर प्रभू शेळके, चौथ्या क्रमांकावर सागर कारंडे, पाचव्या क्रमांकावर संस्कृती साळुंखे आणि सहाव्या स्थानावर प्राजक्ता शुक्रे असल्याचं म्हटलं जात होतं. तर शेवटच्या स्थानावर दिपाली सय्यद असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र ‘भाऊचा धक्का’ या भागाच्या शूटिंगदरम्यान मोठा ट्विस्ट घडल्याचं सांगितलं जात आहे. या एपिसोडमध्ये घरातील एका सदस्याचा प्रवास संपला असून, ती सदस्य म्हणजे Ruchita Jamdar असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. रविवारी प्रसारित होणाऱ्या भागात प्रेक्षकांना हा संपूर्ण प्रसंग पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून Ruchita Jamdar आणि विशाल यांच्यामध्ये सुरू असलेल्या लव्ह अँगलचीही प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होती. दोघांमधील जवळीक अनेकांना लक्षवेधी वाटत होती. मात्र घरातील इतर सदस्यांनी बाहेरच्या परिस्थितीबद्दल काही गोष्टी सांगितल्यानंतर विशालच्या वागण्यात बदल झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर विशाल आणि Ruchita Jamdar यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं.
या सगळ्या घडामोडींमुळे घरात एक वेगळाच ड्रामा तयार झाला होता. त्यामुळे Ruchita Jamdar घरात राहिल्यास पुढे अजून नवे ट्विस्ट पाहायला मिळतील असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला होता. परंतु तिच्या अचानक झालेल्या एलिमिनेशनमुळे अनेक प्रेक्षक नाराज झाल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे.
Ruchita Jamdar घराबाहेर गेल्यानंतर बिग बॉसच्या घरातील समीकरणं कशी बदलणार, विशाल आणि इतर सदस्यांचा खेळ कसा पुढे जाणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे तिच्या जाण्यानंतर घरातील ड्रामा कमी होईल की आणखी नवे वाद निर्माण होतील, हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होणार आहे.
हे पण वाचा .. आईच्या लग्नातील ४० वर्षांपूर्वीचा शालू परिधान करून भावूक झाली ‘अपूर्वा गोरे’; ग्रहमख विधीचे फोटो चर्चेत
bigg boss marathi 6 ruchita jamdar elimination
सध्या मात्र Ruchita Jamdar च्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत बिग बॉस मराठीच्या घरात काय घडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.









