priyadarshan jadhav stress anxiety post : मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता Priyadarshan Jadhav सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि त्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं.
‘टाईमपास २’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला Priyadarshan Jadhav गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तिक आयुष्यात मोठ्या मानसिक चढउतारांचा सामना करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, मागील सहा ते आठ महिन्यांपासून तो तणाव, चिंता आणि नैराश्याच्या अवस्थेतून जात आहे. काम करताना थकवा जाणवतोय, नवीन प्रकल्प हाती घेतले गेले नाहीत, नाटक किंवा चित्रपट लेखन थांबलं आहे, तसेच टेलिव्हिजनवरही काही नवीन दिसत नाही, अशी त्याने प्रामाणिक कबुली दिली.
याचबरोबर त्याने एकाग्रतेचा अभाव, प्रकल्प उशिरा सुरू होणे आणि रिलीज पुढे ढकलले जाणे, लोकांपासून दूर राहण्याची भावना, कधी अत्यंत आनंदी तर कधी असुरक्षित आणि रागावलेला असा भावनिक गोंधळही व्यक्त केला. काही दिवस ध्येय नसल्यासारखे वाटतात आणि झोपेचाही त्रास होतो, असंही त्याने नमूद केलं आहे. Priyadarshan Jadhav च्या या शब्दांमधून त्याची मानसिक अवस्था स्पष्ट जाणवते.
मात्र या सगळ्या अस्थिरतेत अमेरिकेचा दौरा त्याच्यासाठी सकारात्मक ठरल्याचंही त्याने सांगितलं. लास वेगासमध्ये काढलेला एक फोटो शेअर करत त्याने एका रात्री कॅसिनोमध्ये नशीब आजमावल्याचा उल्लेख केला. योगायोगाने २०३ डॉलर्स जिंकल्यानंतर तो आणि त्याचे मित्र अॅरिझोना येथील ग्रँड केनियनला गेले आणि तिथे मनमुराद आनंद घेतला, असा अनुभव त्याने शेअर केला आहे.
त्याच्या पोस्टमधील एक वाक्य विशेष लक्षवेधी ठरत आहे—“वाईट नशीब आवाज करतं, पण शहाणपणाला शांतपणे माघार कधी घ्यायची हे माहित असतं.” या ओळींतून त्याने आयुष्यातील कठीण काळाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा संदेश दिला आहे. तसेच प्रेम आणि विनोद कठीण परिस्थितीतही मार्ग दाखवू शकतात, असा आशावादही व्यक्त केला.
हे पण वाचा.. Shiv Jayanti 2026: शिवनेरीच्या पायथ्याशी ‘रुचिरा जाधव’ची शिवगर्जना; व्हिडीओ पाहून अंगावर येतो शहारा
Priyadarshan Jadhav च्या या मनमोकळ्या कबुलीमुळे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत असून लवकरच तो पुन्हा नव्या उर्जेसह कामात दिसावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. कलाकार म्हणून यशस्वी वाटचाल करत असताना मानसिक आरोग्याच्या विषयावर खुलेपणाने बोलण्याचं धाडस त्याने दाखवलं आहे, हे निश्चितच कौतुकास्पद मानलं जात आहे.
हे पण वाचा.. डेंटिस्ट होती ‘शिवा’ मालिकेतील दिव्या! अभिनेत्री सृष्टी भेकर कशी आली अभिनयक्षेत्रात?









