prajakta gaikwad tuljapur tuljabhavani darshan ::मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Prajakta Gaikwad सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच शाही थाटात विवाहसोहळा पार पाडल्यानंतर प्राजक्ताने आपल्या आयुष्यातील हा नवा अध्याय भक्तीभावाने सुरू केला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच तिने सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या Tulja Bhavani Temple येथे भेट देत देवीचं दर्शन घेतलं.
तुळजापूर येथे पोहोचल्यानंतर प्राजक्ताने आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म आणि कुलाचाराचे सर्व विधी श्रद्धेने पार पाडले. देवीची विधीवत आरती करत तिने ओटी भरली आणि आपल्या कुटुंबासह चाहत्यांच्या सुख-समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. तिच्या या दर्शनावेळी मंदिर परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ऐतिहासिक आणि दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी प्राजक्ता प्रत्यक्षातही अत्यंत साधी, भक्तीभावी असल्याचं या भेटीतून दिसून आलं.
प्राजक्ता गायकवाड ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाने तिने केवळ लोकप्रियताच नाही तर प्रेक्षकांचा विश्वासही मिळवला. लग्नानंतर तिच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं विशेष लक्ष आहे. तुळजाभवानी दर्शनानंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याआधी प्राजक्ताने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत पती शंभुराज खुटवड यांच्यासोबत घृष्णेश्वर मंदिरात साजरी केली होती. त्या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी आनंद शेअर केला होता. सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्राजक्ता तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अपडेट्स देत असते.
हे पण वाचा.. निसर्गाच्या कुशीत शिक्षण! मृण्मयी देशपांडे आणि पतीने सुरू केली अनोखी संकल्पना
मराठी टेलिव्हिजनसह चित्रपटसृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. ‘आई माझी काळूबाई’सारख्या मालिकांपासून ते ‘लॉकडाऊन लग्न’, ‘सिंगल’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटांमधून तिचा अभिनय प्रेक्षकांनी अनुभवला आहे. आता लग्नानंतर आणि देवीच्या आशीर्वादानंतर तिच्या करिअरचा पुढचा प्रवास कसा असेल, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. Prajakta Gaikwad च्या या भक्तीपूर्ण दर्शनामुळे तिच्या चाहत्यांमध्येही समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं
हे पण वाचा.. लग्नानंतर होईलच प्रेम : रम्याच्या कारस्थानामुळे पार्थ-काव्याच्या नात्यात ताण, जीवाने नंदिनीला दिला Gen-Z सल्ला









