ADVERTISEMENT

व्हॅलेंटाईन डेसाठी भन्नाट डाव! वीण दोघांतली ही तुटेना मध्ये स्वानंदी-समरचा खास रोमँटिक एपिसोड, प्रोमोने वाढवली उत्सुकता

veen doghantali hi tutena valentine special episode : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत व्हॅलेंटाईन डे निमित्त दोन तासांचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, स्वानंदी-समरच्या नात्यातील भावनिक आणि रोमँटिक क्षणांचा खास मेळ पाहायला मिळणार आहे.
veen doghantali hi tutena valentine special episode

veen doghantali hi tutena valentine special episode : वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. समर आणि स्वानंदी यांच्यातील नातं सुरुवातीपासूनच गैरसमज, दुरावा आणि मनात दडलेल्या प्रश्नांनी भरलेलं होतं. मात्र अंशुमनचं सत्य उघड झाल्यानंतर कथानकाला नवा वळण मिळालं असून, समरचा स्वानंदीवरील विश्वास हळूहळू दृढ होताना दिसत आहे. तिच्या भावना, तिचं दु:ख आणि तिची घालमेल आता तो अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे.

स्वानंदी फोनवर रडताना दिसल्यावर समरच्या मनात अनेक विचारांची घालमेल सुरू होते. तिला विचारावं की नाही, तिला त्रास तर झाला नसेल ना, अशा प्रश्नांनी तो अस्वस्थ होतो. याच भावनिक टप्प्यावर आजी समर-स्वानंदीच्या नात्यात पुन्हा जवळीक आणण्यासाठी पुढाकार घेताना दिसणार आहे. आजी थेट दोघांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा सल्ला देते. मात्र समर या कल्पनेला स्पष्ट नकार देतो. तरीही आजी हार मानत नाही आणि अधिरावर जबाबदारी सोपवते.

आजीच्या सांगण्यावरून अधिरा एक भन्नाट प्लॅन आखते. ती समरला फोन करून गाडी बिघडल्याचं खोटं कारण सांगते, तर दुसरीकडे रोहन स्वानंदीला तसाच फोन करतो. या गोंधळात दोघंही मदतीसाठी एका हॉटेलमध्ये पोहोचतात. मात्र तिथे गेल्यावर त्यांना कळतं की हे सगळं एका व्हॅलेंटाईन पार्टीसाठी रचलेलं नाट्य आहे. याच पार्टीमध्ये स्वानंदी-समरचे काही खास, हळवे आणि रोमँटिक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत

मात्र या आनंदातही अडथळे येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मल्लिका या प्रसंगातही कुरघोडी करण्याचा डाव आखते. तिचा हा प्लॅन यशस्वी होणार की रोहन यावेळी ठाम उभा राहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याच कारणामुळे Veen Doghantali Hi Tutena चा हा व्हॅलेंटाईन विशेष भाग अधिक रंगतदार ठरणार आहे.

हे पण वाचा.. कमळी मालिकेत दणक्यात शिवजयंती! kamali पोहोचली रायगडावर, खास एपिसोड

या प्रोमोला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांनी “आजीची आयडिया कमाल आहे”, “समर-स्वानंदीला एकत्र पाहून खूप छान वाटलं”, “फक्त आता मल्लिकाने गडबड करू नये” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा दोन तासांचा विशेष भाग १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार असून, Veen Doghantali Hi Tutena चाहत्यांसाठी हा दिवस नक्कीच खास ठरणार आहे.

हे पण वाचा.. नवरोबा…च्या हाकेवर अर्जुन लाजला! ठरलं तर मग मध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त सायलीचं Teddy Bear सरप्राइज

veen doghantali hi tutena valentine special episode