tharala tar mag valentines day sayli arjun romance : ठरलं तर मग (Tharala Tar Mag) या लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांना एक वेगळाच आणि गोड अनुभव पाहायला मिळतो आहे. अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यात झालेल्या कामांच्या अदलाबदलीमुळे कथानकाला नवी दिशा मिळाली आहे. अर्जुन आता घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसतोय, तर सायली ऑफिसच्या कामात पूर्णपणे गुंतलेली आहे. दोघांसाठीही ही परिस्थिती नवी असली तरी एकमेकांच्या साथीने ते हे आव्हान समर्थपणे पेलताना दिसत आहेत.
सायलीच्या कामाचं कौतुक तिचा मित्र चैतन्य अर्जुनसमोर फोनवर करतो, तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दोन्ही झळकतात. दुसरीकडे, अर्जुन-सायलीचा सुखी संसार पाहून प्रिया मात्र अस्वस्थ आहे. ती सतत काही ना काही डावपेच रचून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, आता अर्जुन आणि सायली दोघेही प्रियाच्या हालचालींकडे सतर्क नजरेने पाहत आहेत.
या सगळ्यातच Tharala Tar Mag मध्ये येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचा खास भाग दाखवला जाणार आहे. कामांची अदलाबदल झाल्यामुळे त्या दिवशी अर्जुन घरात स्वयंपाक करतो आणि ऑफिसमधून येणाऱ्या सायलीची आतुरतेने वाट पाहतो. गाडीचा हॉर्न ऐकून तो आनंदाने दरवाज्याकडे धावतो, पण समोर सायली नसल्याचं पाहून तो गोंधळून जातो. इतक्यात त्याच्या मागून “नवरोबा…” असा आवाज येतो आणि त्या एका शब्दाने अर्जुनचा चेहरा खुलून जातो.
सायलीने यावेळी अर्जुनसाठी खास Teddy Bear चा अवतार घेतलेला असतो. अचानक समोर आलेलं हे सरप्राइज पाहून अर्जुन लाजतो, तर सायली आनंदाने त्याला मिठी मारते. घरातच उभी असलेली कल्पना सासूबाईही हा क्षण पाहून प्रचंड खुश होतात. सगळ्यांसमोर मिठी मारताना अर्जुन थोडा संकोच व्यक्त करतो, पण सायली त्यालाच मिश्किल उत्तर देत पेचात टाकते. तिच्या या बोलण्यावर अर्जुन “बेस्ट वन” म्हणत तिचं कौतुक करतो.
हे पण वाचा.. शेवटची भेटही नशिबी आली नाही…” आईच्या आठवणींनी भाग्यश्री न्हाळवे पुन्हा भावुक
यानंतर सायली प्रेमाने अर्जुनला “नवरोबा तुम्हाला Happy Valentine’s Day” असं म्हणते आणि हा क्षण अधिकच खास होतो. या प्रोमोला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, “अर्जुन-सायली म्हणजे प्रेम”, “किती सुंदर ट्रॅक आहे”, “१४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतोय” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. एकूणच Tharala Tar Mag मधील हा रोमँटिक व्हॅलेंटाईन डे ट्रॅक प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. विशाल निकम अक्षय हिंदळकर उत्तराखंडमध्ये अडकले विवाहबंधनात Vishal Nikam Akshaya Hindalkar Wedding









