ADVERTISEMENT

Tharala Tar Mag: कोर्टात अर्जुनची कोंडी, महिपतची पलटी; नागराजला बेल मिळण्याची दाट शक्यता

tharala tar mag court case nagraj bail drama : ठरलं तर मग मालिकेच्या 4 फेब्रुवारी 2026 च्या भागात कोर्टातील सुनावणी निर्णायक वळणावर आली असून नागराजला बेल मिळणार का, यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
tharala tar mag court case nagraj bail drama

tharala tar mag court case nagraj bail drama : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag मध्ये 4 फेब्रुवारी 2026 चा भाग प्रेक्षकांसाठी प्रचंड तणावपूर्ण ठरला. नागराज किल्लेदारविरोधात सुरू असलेली कोर्ट केस निर्णायक टप्प्यावर पोहोचली असली, तरी ठोस पुराव्यांच्या अभावामुळे चित्र गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. आजच्या भागात कोर्टातील घडामोडींमुळे अर्जुनची मेहनत फसते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

कोर्टात सुमन नागराजविरोधात साक्ष देण्यासाठी उभी राहते. मात्र नागराजचे वकील भालेराव तिच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. सुमन मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा युक्तिवाद करत तिची साक्ष ग्राह्य धरू नये, अशी मागणी ते करतात. न्यायाधीशांनाही हा मुद्दा विचार करण्यास भाग पाडतो. त्यानंतर रविराज कोर्टात उभा राहून गेल्या 22 वर्षांचा अन्याय मांडतो. नागराजमुळे आपल्या कुटुंबाला कसं उद्ध्वस्त व्हावं लागलं, पत्नी आणि मुलगी आपल्यापासून कशा दूर गेल्या, हे सांगताना तो भावुक होतो. हा फक्त एका अपघाताचा विषय नसून, दशकानुदशकांचा कटकारस्थानाचा परिणाम असल्याचं तो ठामपणे सांगतो.

दरम्यान, सुभेदारांच्या घरात प्रिया देवापुढे सतत प्रार्थना करताना दिसते. नागराज आणि महिपतला कठोर शिक्षा व्हावी, एवढीच तिची मागणी असते. त्या दोघांना शिक्षा झाली तरच आपण मोकळा श्वास घेऊ शकू, अशी भावना ती व्यक्त करते.

कोर्टात अर्जुन रविराजला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावून प्रश्न विचारतो. अपघाताबाबत नागराजशी कधी चर्चा झाली का, असा सवाल केल्यावर रविराज अनेक गोष्टी लपवल्या गेल्याचं सांगतो. गेल्या काही दिवसांत पुन्हा तपासणी केल्यानंतर नागराजविरोधात काही पुरावे सापडल्याचं तो नमूद करतो. मात्र ही माहितीही कोर्टात निर्णायक ठरत नाही.

सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा महिपत शिखरे कोर्टात पलटी मारतो. अपघाताची सुपारी आपल्याकडेच होती, हे माहित असूनही तो सत्य सांगण्यास नकार देतो. अर्जुन आक्रमक होऊन उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण भालेराव तात्काळ आक्षेप घेतात. अखेरीस महिपत काहीही न बोलता कोर्टातून निघून जातो, आणि यामुळे नागराजचं पारडं अधिक जड होतं.

अर्जुनने दाखवलेला सुमनचा व्हिडिओही मॉर्फ केलेला असू शकतो, असा दावा करत तो पुरावाही फेटाळला जातो. परिणामी, नागराजविरोधात ठोस पुरावे नसल्याचा मुद्दा पुढे करत भालेराव बेलची मागणी करतात. न्यायाधीश निर्णय उद्यावर ढकलतात, ज्यामुळे सुमन पुन्हा एकदा घाबरते. नागराज बाहेर आला तर आपल्याला त्रास देईल, ही भीती ती व्यक्त करते.

हे पण वाचा.. लग्नानंतर होईलच प्रेम प्रोमोमध्ये भावनिक वळण; गैरसमज दूर होणार, नात्यांना नवी दिशा

भागाच्या शेवटी नागराज जेलमध्ये परत येतो आणि महिपतसमोर फुशारक्या मारत आपली बेल मिळणारच असल्याचा आत्मविश्वास दाखवतो. Tharala Tar Mag मधील ही कोर्टरूम ड्रामा आता निर्णायक वळणावर पोहोचली असून, उद्याचा निकाल नेमका काय असणार, याकडे प्रेक्षकांची नजर लागून राहिली आहे.

हे पण वाचा. शुभ श्रावणी मालिकेत कोल्हापूरचा शुभंकर! सुमित पाटीलची झाली खास निवड, अभिनेता म्हणाला – घरच्या मातीची भूमिका मिळाली