kamali serial kamali khari olakh anna purna nat : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Kamali सध्या अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या काही भागांपासून प्रेक्षक अन्नपूर्णा आजींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत होते. मानसिक धक्का, कौटुंबिक कटकारस्थानं आणि सत्य लपवण्याचे प्रयत्न यामुळे कथानक अधिकच गंभीर होत गेलं. मात्र आता या सगळ्याला पूर्णविराम मिळणार असल्याचे संकेत नव्या प्रोमोमधून मिळत आहेत.
कामिनीने अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीचा मृत्यू झाल्याचं भासवण्यासाठी रचलेला डाव कमळीने पुरता उधळून लावला. महाजन कुटुंबाची मोठी नात अजूनही जिवंत आहे, हे सत्य समोर येत असतानाच अन्नपूर्णा आजींना मोठा मानसिक धक्का बसतो. आपली लाडकी नात कायमची निघून गेली, या गैरसमजातून आजींची तब्येत अधिकच खालावते. हीच संधी साधत कामिनी आणि अनिका सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी पुढे सरसावतात.
अन्नपूर्णा आजी मानसिकदृष्ट्या खचलेल्या असल्याने पुढील काही दिवसांत सगळी मालमत्ता आपल्या नावावर होणार, असा दावा अनिका कमळीसमोर ठामपणे करते. अन्नपूर्णा कॉलेजच्या ट्रस्टीपदावर आपलीच नियुक्ती होणार, या गर्वाने ती वावरताना दिसते. अनिकाचा हा आत्मविश्वास पाहून कमळी हादरते, मात्र ती हार मानत नाही. काहीही झालं तरी आजींना या धक्क्यातून सावरलं पाहिजे, असा निर्धार ती करते.
या संघर्षात हृषी पूर्णपणे कमळीच्या पाठीशी उभा आहे. याच दरम्यान एक अत्यंत महत्त्वाचं सत्य प्रेक्षकांसमोर येण्याच्या तयारीत आहे. हृषीच्या घरी नाव बदलून काम करणाऱ्या साधना ताई या कमळीच्या खऱ्या आई आहेत. हे गुपित उघड झाल्यानंतर कमळीच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. हृषी लवकरच मायलेकींची भेट घडवून आणणार असल्याचं सूचित करतो, ज्यामुळे कथानकाला भावनिक खोली मिळणार आहे.
Kamali मालिकेतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अन्नपूर्णा आजींची खरी नात नेमकी कोण, याचं उत्तर आता मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की कमळी हीच अन्नपूर्णा देवींची खरी नात आहे. महाजनांच्या घरात नात म्हणून तिची दणक्यात एन्ट्री होणार असून हा खुलासा ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हे पण वाचा.. घरातून बाहेर पडायचीही भीती वाटायची… वल्लरी विराजने मोकळेपणाने सांगितला तिचा संघर्ष
हे सत्य समोर आल्यानंतर आजींची प्रतिक्रिया काय असेल, कामिनी-अनिकाचे डाव कसे कोसळतील आणि कमळीला या लढाईत कोणाची साथ मिळेल, हे पाहणं आता अधिकच रंजक ठरणार आहे. Kamali मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होते आणि येणारे भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहेत.







