ADVERTISEMENT

शुभविवाह मधील पौर्णिमाच्या घरी आनंदाचं पर्व – कुंजिका काळविंटच्या लेकाचं बारसं उत्साहात पार

kunjika kalwint sons barsa celebration‌ joy : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’मधून घराघरात पोहोचलेली पौर्णिमा, म्हणजेच अभिनेत्री KunjikaKalwint, सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय खास आणि भावनिक टप्पा अनुभवत आहे. काही दिवसांपूर्वीच कुंजिकानं आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून तिनं पुत्ररत्न प्राप्त झाल्याचं जाहीर केलं होतं आणि त्या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या होत्या.

बाळाच्या जन्मानंतर साधारण महिनाभरानं KunjikaKalwint हिनं पहिल्यांदाच मुलाबद्दल सविस्तर भावना व्यक्त करत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिनं बाळाचा छोटासा हात आपल्या हातात घेतलेला फोटो शेअर केला होता. आई झाल्यानंतरचे दिवस कसे बदलून टाकणारे असतात, हे तिनं अतिशय साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांत मांडलं होतं. झोप न लागलेल्या रात्री, बाळाला कडेवर घेऊन झालेल्या गप्पा आणि शब्दांत न मावणाऱ्या प्रेमाचा अनुभव तिनं प्रामाणिकपणे मांडला होता.

आता या आनंदात आणखी एक गोड क्षण जोडला गेला आहे. KunjikaKalwint च्या लाडक्या लेकाचं बारसं नुकतंच पार पडलं असून या सोहळ्याचे काही खास फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कुंजिका आणि तिचा पती बाळाला प्रेमानं जवळ घेताना दिसत आहेत. साधेपणा, संस्कार आणि कुटुंबीयांचा जिव्हाळा या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवतो.

कुंजिकानं आपल्या मुलाचं नाव ‘कान्हा’ ठेवलं आहे. श्रीकृष्णाशी संबंधित असलेलं हे नाव आणि त्याला साजेसा बारसाचा थाटही पाहायला मिळतो. दहीहंडीची प्रतिकृती, लाल रंगाची थीम आणि पारंपरिक पेहराव यामुळे हा सोहळा अधिकच खास ठरला. कुंजिकानं लाल साडी परिधान केली होती, तर तिच्या पतीनं लाल कुर्ता घातला होता. चिमुकल्या कान्हानंही कुर्ता आणि धोतर असा गोंडस पेहराव केला होता, ज्यामुळे चाहत्यांनी फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

करिअरबद्दल बोलायचं झालं, तर KunjikaKalwint हिनं आजवर अनेक मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘स्वामिनी’ मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली, तर ‘ती परत आलीये’सारख्या हॉरर मालिकेतही तिनं प्रभावी भूमिका साकारली. ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत असतानाच गरोदरपणामुळे तिनं मालिकेतून ब्रेक घेतला. सध्या मात्र ती पूर्णपणे मातृत्वाच्या आनंदात रमलेली दिसते आहे.

हे पण वाचा.. अंशुमनचा खरा चेहरा उघड! वीण दोघांतली ही तुटेना मध्ये स्वानंदीमुळे राजवाडे घरात सत्तापालटाची ठिणगी

चाहत्यांसाठी KunjikaKalwint चा हा नवा प्रवास प्रेरणादायी आणि भावनिक ठरत असून, तिच्या आयुष्यातील हे सुखद क्षण सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत.

हे पण वाचा.. देवमाणूस मध्ये धक्कादायक वळण! इन्स्पेक्टर जामकर करणार गोपाळचा पर्दाफाश? नव्या प्रोमोने वाढवली खळबळ

kunjika kalwint sons barsa celebration‌ joy

Leave a Comment