ADVERTISEMENT

मी तुझ्या प्रेमात नाही, पण तू मला आवडतेस…” अंबर गणपुळेंचं वेगळंच प्रपोजल चर्चेत

shivani sonar ambar ganpule love story : शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त समोर आलेल्या खास व्हिडीओतून त्यांच्या प्रेमकथेचे अनोखे किस्से उलगडले आहेत. प्रामाणिक प्रपोजलपासून गाण्यातून व्यक्त झालेल्या भावना पुन्हा चर्चेत आल्या आहेत
shivani sonar ambar ganpule love story

shivani sonar ambar ganpule love story : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Shivani Sonar सध्या केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ‘तारिणी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानी सोनारने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील भूमिकेसोबतच ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

२०२५ मध्ये अभिनेता अंबर गणपुळेसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर शिवानी सोनारच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू झाला. नुकताच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून, या निमित्ताने समोर आलेला एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी आणि अंबर दोघेही त्यांच्या प्रेमकथेतील काही खास, गंमतीशीर आणि भावनिक क्षण उलगडताना दिसतात.

शिवानी सोनारने या व्हिडीओमध्ये अंबरच्या अनोख्या प्रपोजलचा किस्सा सांगितला आहे. अंबरने तिला लग्नाचा प्रस्ताव देताना अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली होती. “मी सध्या तुझ्या प्रेमात नाही, पण तू मला आवडतेस. आपण जर एकत्र येणार असू, तर थेट लग्नासाठीच,” असं अंबरने सांगितल्याचं शिवानीने हसत आठवलं. त्या क्षणी तिला हे ऐकून आश्चर्य वाटल्याचं ती सांगते, कारण अशा प्रकारे प्रपोज करणारा मुलगा तिने कधीच पाहिला नव्हता.

यावर अंबर गणपुळेही आपली बाजू स्पष्ट करत म्हणतो की, त्या वेळेला तो प्रामाणिक होता. खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा स्पष्ट बोलणं योग्य वाटलं. आज तो शिवानीच्या प्रेमात आहे, पण तेव्हाची प्रामाणिकता त्याच्यासाठी महत्त्वाची होती. शिवानी सोनारलाही अंबरचा हा स्पष्टवक्तेपणा पहिल्यापासूनच भावलेला होता, असं ती आवर्जून सांगते.

दोघांच्या नात्यातील आणखी एक गोड क्षण म्हणजे गाण्याच्या माध्यमातून व्यक्त झालेलं प्रेम. ‘This or That’ खेळताना शिवानीने सहजपणे विचारलेला प्रश्न आणि त्यावर अंबरने पाठवलेलं ‘आज से तेरी…’ हे गाणं, या छोट्याशा घटनेतून त्याच्या भावना तिला पूर्णपणे समजल्या होत्या.

या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील काही खास क्षणही दाखवण्यात आले असून, अनेक मराठी कलाकारांनी त्यावर प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनीही शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे या जोडीचं भरभरून कौतुक केलं आहे.

हे पण वाचा.. देवमाणूस मधून सिमरन खेडकर ची एक्झिट पोस्ट शेअर करत म्हणाली

दरम्यान, अंबर गणपुळे सध्या ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तर शिवानी सोनार तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच त्यांच्या प्रामाणिक नात्यामुळे ही जोडी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. अंजलीसमोर उघड होणार का राकेशचा खरा चेहरा? तू ही रे माझा मितवा मालिकेत अर्णवचा संताप अनावर

shivani sonar ambar ganpule love story