tharala tar mag nagraj real face revealed : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. गेल्या काही भागांपासून सुरू असलेला संशय, गूढता आणि कटाचा थरार आता हळूहळू उलगडताना दिसतोय. कथानकात महिपतला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अर्जुन आणि सायली केवळ सुमनचा शोध घेत नाहीत, तर २२ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघातामागील सत्य शोधण्याचाही प्रयत्न करत आहेत.
या अपघातामागे नेमकं कोण होतं आणि सुपारी कोणी दिली, याचा छडा लावण्यासाठी अर्जुन महिपतला प्रश्न विचारतो. मात्र, महिपत काही बोलण्याच्या तयारीत असतानाच नागराज त्याला थांबवतो. साक्षीच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवून तो महिपतला गप्प बसण्यास भाग पाडतो. लेकीच्या सुरक्षिततेसाठी महिपत सत्य लपवतो, पण याच गप्पीमुळे अर्जुनच्या मनात नागराजविषयीचा संशय अधिकच बळावतो.
दरम्यान, येत्या भागांमध्ये अर्जुन आणि सायली अखेर सुमनला शोधून काढतात. सुमन थेट नागराजनेच आपलं अपहरण केल्याचं सांगते, ज्यामुळे अर्जुन-सायलीचा संशय आणखी ठोस होतो. सुमनला घरी आणल्यानंतर आता सर्वांसमोर सत्य येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या Tharala Tar Mag च्या नव्या प्रोमोमध्ये हा थरार आणखी वाढलेला दिसतो. चैतन्य कोर्टाची नोटीस घेऊन अर्जुनकडे येतो आणि महिपतच्या घरात कायदेशीररित्या झडती घेण्याचा मार्ग मोकळा होतो. अर्जुन, सायली आणि पोलीस मिळून महिपतच्या घरात शोध घेतात. याच झडतीदरम्यान एका बॅगेत महत्त्वाची कागदपत्रं आणि एक एन्व्हलप सापडतो. त्या एन्व्हलपवर ‘Payment To N.K’ असं लिहिलेलं असतं.
‘N.K’ म्हणजे नेमकं कोण, असा प्रश्न अर्जुन विचारतो आणि सायली थेट नाव घेते – नागराज किल्लेदार. या एका पुराव्यामुळे नागराजच्या कटावर शिक्कामोर्तब होणार का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. याचबरोबर प्रियाचं लपलेलं सत्यही सर्वांसमोर येणार का, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. प्रसूतीच्या कळांमध्येही तू माझ्यासोबत होतास…” – कुंजिका काळविंट ची नवऱ्यासाठीची भावूक पोस्ट चर्चेत
Tharala Tar Mag मधील हा टप्पा मालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नागराजचा खरा चेहरा उघड होणार का, सुमन सर्व सत्य सांगणार का आणि अर्जुन-सायलीला न्याय मिळणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने पुढील भागांची वाट पाहत आहेत.
हे पण वाचा.. अभिनेत्री दीक्षा काटकरचा साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली चाहत्यांना गोड बातमी









