bigg boss marathi 6 radha patil boyfriend revelation : बिग बॉस मराठी ६ च्या घरात केवळ टास्क, नॉमिनेशन किंवा वाद-विवादच पाहायला मिळत नाहीत, तर अनेक नातेसंबंधही इथे आकार घेतात. काही दिवसांतच घरात तयार झालेल्या मैत्र्यांपैकी Radha Patil आणि अनुश्री माने यांची जोडी सध्या विशेष चर्चेत आहे. दोघींमधील गप्पा, एकमेकांवरचा विश्वास आणि मोकळेपणाने होणाऱ्या चर्चा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
अलीकडेच गार्डन एरियामध्ये सकाळच्या वेळेत या दोघी निवांत बसून गप्पा मारताना दिसल्या. याच वेळी Radha Patil ने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला. तिने सांगितलं की, ती गेल्या काही वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. हा खुलासा करताना तिच्या बोलण्यातून तिच्या नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम स्पष्टपणे जाणवत होतं.
Radha Patil ने सांगितलं की, ते दोघे २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतात, जिथे त्यांची बेडरूम वेगळी असून इतर मुलींसाठी स्वतंत्र खोली आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वभावाबद्दल बोलताना राधा म्हणाली की, कुणीही तिला त्रास दिला तर तो शांत बसणारा नाही. विशेष म्हणजे त्याला कोणतंही व्यसन नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्याने स्वतःच्या हाताने कधी जेवणही केलं नाही. तो नेहमी राधाच्या हातचं जेवण खातो, असं सांगताना तिच्या चेहऱ्यावर प्रेमळ भाव दिसत होते.
शोमध्ये सध्या तिला इतर स्पर्धकांकडून टोमणे आणि बोलणी ऐकावी लागत असल्याने राधा भावुक झाली. ती म्हणाली की, तिचा बॉयफ्रेंड इथे असता तर कदाचित हे सगळं सहन केलं नसतं. यावर अनुश्रीने हसतच तिलाही आता एखादा बॉयफ्रेंड शोधायला हवा, असं म्हणत वातावरण हलकं केलं. अनुश्रीने राधाच्या बॉयफ्रेंडविषयी आपली फॅनगिरीही व्यक्त केली आणि त्याचं एक गाणं आपल्याला विशेष आवडत असल्याचं सांगितलं.
Radha Patil पुढे म्हणाली की, बाहेर फिरायला गेल्यावर लोक तिच्यापेक्षा तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो काढण्यासाठी जास्त उत्सुक असतात. तरीही तो कधीच तिचा हात सोडत नाही, हे सांगताना तिच्या डोळ्यांत प्रेम दिसत होतं. तीन वर्षांच्या नात्यात कधीच प्रेम कमी झाल्यासारखं वाटलं नाही, असंही तिने नमूद केलं. मात्र, घरात आल्यापासून त्याची खूप आठवण येते आणि त्यामुळे अनेकदा डोळे भरून येतात, असं ती भावुकपणे सांगते.
हे पण वाचा.. Tharala Tar Mag : सुमनच्या हुशारीने उघडकीस आलं नागराजचं सत्य, सायली-अर्जुनची थरारक एंट्री!
या संवादाच्या शेवटी Radha Patil ने अनुश्रीला तिच्या बॉयफ्रेंडचं पूर्ण नावही सांगितलं. मात्र, हे नाव एपिसोडमध्ये टेलिकास्ट करताना म्युट करण्यात आलं आहे. तरीही, या खुलास्यामुळे Radha Patil पुन्हा एकदा Bigg Boss Marathi 6 मध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
हे पण वाचा.. नवऱ्याच्या जीवासाठी नंदिनीचा धाडसी निर्णय; लग्नानंतर होईलच प्रेम च्या नव्या प्रोमोमध्ये दिसणार ‘चकाचक बाई’चा वेडेपणा







