ADVERTISEMENT

अभिनेत्री रसिका वाखारकर अडकली विवाहबंधनात, शुभांकर उंब्राणीसोबत थाटात पार पडला लग्नसोहळा

Rasika Wakharkar wedding ceremony with Shubhangkar Umbrani : रसिका वखारकर हिने अखेर शुभांकर उंब्राणी याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Rasika Wakharkar wedding ceremony with Shubhangkar Umbrani

Rasika Wakharkar wedding ceremony with Shubhangkar Umbrani : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Rasika Wakharkar सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रसिका अखेर विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या आणि अखेर आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रसिकाने तिचा जोडीदार शुभांकर उंब्राणी याच्यासोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.

लग्नापूर्वीच रसिकाने सोशल मीडियावर काउंटडाऊन सुरू केला होता. रोज नवनवीन पोस्ट शेअर करत ती चाहत्यांना तिच्या खास क्षणांचा भाग बनवत होती. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली होती. अखेर आज पारंपरिक पद्धतीने तिचा विवाहसोहळा पार पडला. Rasika Wakharkar Marriage चे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

लग्नासाठी रसिकाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. पारंपरिक दागिने आणि साधा, पण उठावदार लूक यामुळे ती अधिकच खुलून दिसत होती. तर शुभांकरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचे उपरणे परिधान करत रसिकाच्या पोशाखाशी सुंदर समन्वय साधला होता. दोघांची जोडी चाहत्यांना विशेष भावली असून कमेंट्समध्ये शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

लग्नाआधी पार पडलेल्या विधींमधील क्षणही रसिकाने सोशल मीडियावर शेअर केले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रहमख विधीसाठी तिने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी दिलेली खास साडी नेसली होती. हळदीच्या कार्यक्रमातही पिवळ्या रंगाच्या साडीत ती पारंपरिक अंदाजात दिसली. या सर्व विधींना मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

शुभांकर उंब्राणी हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून काही महिन्यांपूर्वी रसिकाने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. ७ सप्टेंबर रोजी तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करत “माझ्या खऱ्या आयुष्यातला प्लस वन” अशी भावनिक कॅप्शन दिली होती. त्यानंतरपासून Rasika Wakharkar च्या चाहत्यांना तिच्या लग्नाची प्रतीक्षा होती.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : कॅप्टन्सी कार्यात तणावाचा स्फोट, शेणाचं की मेणाचं दार? मित्रीतच पडली फूट

आता हा थाटामाटात पार पडलेला विवाहसोहळा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातही रसिकाला आनंद आणि स्थैर्य लाभो, अशाच शुभेच्छा तिचे चाहते देत आहेत.

हे पण वाचा.. अश्विनी महांगडेची ‘माया’ भूमिका: सोज्वळ अनघानंतर का स्वीकारले कपटी मायाचे पात्र?

Rasika Wakharkar wedding ceremony with Shubhangkar Umbrani