ADVERTISEMENT

अभिनयापलीकडचा नवा प्रवास : स्वानंदी बेर्डे ने सुरू केला स्वतःचा ज्वेलरी ब्रँड, चाहत्यांमध्ये चर्चा

swanandi berde jewellery brand kantpriya : मराठी अभिनेत्री स्वानंदी बेर्डे हिने अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकत स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. आई-वडिलांच्या नावावरून ठेवलेलं ‘कांतप्रिया’ हे नाव सध्या चर्चेत आहे.
swanandi berde jewellery brand kantpriya

swanandi berde jewellery brand kantpriya : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतोय. अभिनयासोबतच अनेक कलाकार स्वतःची ओळख एक उद्योजक म्हणून निर्माण करत आहेत. पार्लर, फॅशन ब्रँड, साड्यांचे व्यवसाय, ब्युटी प्रॉडक्ट्स अशा विविध क्षेत्रांत मराठी कलाकारांनी यशस्वी पावलं टाकली आहेत. तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे, मृणाल दुसानीस यांसारख्या अभिनेत्रींनी व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली असून ते नाव आहे Swanandi Berde.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची कन्या Swanandi Berde हिने नुकतंच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनयात स्वतःचं स्थान निर्माण केल्यानंतर तिने आता स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला असून त्याचं नाव आहे ‘कांतप्रिया’. या नावामागे एक भावनिक नातं दडलेलं आहे. वडील लक्ष्मीकांत यांच्या नावातील ‘कांत’ आणि आई प्रिया यांच्या नावातील ‘प्रिया’ या दोन नावांच्या संगमातून ‘कांतप्रिया’ हे ब्रँडनेम साकारण्यात आलं आहे.

Swanandi Berde हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केल्यानंतर तिने व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या मनाला भिडल्या. तिच्यासाठी ‘कांतप्रिया’ हा केवळ एक व्यवसाय नसून आई-वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या आठवणींचा वारसा असल्याचं तिनं स्पष्ट केलं. दागिन्यांच्या माध्यमातून तो वारसा पुढे नेण्याचा हा एक प्रयत्न असल्याचंही तिने सांगितलं.

अभिनय क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर Swanandi Berde हिने ‘मन येड्यागत झालं’ आणि ‘रिस्पेक्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच काही नाटकांतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

विशेष म्हणजे Swanandi Berde केवळ अभिनेत्री आणि उद्योजिका एवढ्यावरच थांबलेली नाही. ती भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे, उत्तम चित्रकार आहे, तसेच ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रातही तिला रस आहे. याशिवाय ती सध्या कायद्याचं शिक्षणही घेत असल्याचं तिच्या आई प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

हे पण वाचा.. चुकीच्या व्यक्तीपेक्षा एकटीच बरी’  क्रिस्टल डिसूझा हिने ब्रेकअपनंतर प्रेमावर व्यक्त केलं स्पष्ट मत

अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे Swanandi Berde सध्या मराठी इंडस्ट्रीत एक वेगळं आणि प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. अभिनय, कला आणि आता व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांत ती स्वतःची ओळख ठसवत असून तिचा हा नवा प्रवास चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

हे पण वाचा.. मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरच्या लग्नाआधीची धमाल; हळदीचे खास फोटो व्हायरल

swanandi berde jewellery brand kantpriya