ADVERTISEMENT

चुकीच्या व्यक्तीपेक्षा एकटीच बरी’  क्रिस्टल डिसूझा हिने ब्रेकअपनंतर प्रेमावर व्यक्त केलं स्पष्ट मत

crystal dsouza love and breakup thoughts : ‘धुरंधर’मधील शरारत गाण्यामुळे चर्चेत असलेली क्रिस्टल डिसूझा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या प्रेम आणि नातेसंबंधांबाबत स्पष्ट मत मांडत ब्रेकअपवर अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.
Krystle D'Souza love and breakup thoughts

Krystle D’Souza love and breakup thoughts : टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होत असते. कोण कोणाच्या प्रेमात आहे, कोणाचं ब्रेकअप झालं, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतंच. काही कलाकार सहकलाकारांशी नातं जोडतात, तर काहीजण इंडस्ट्रीबाहेरील जोडीदार निवडतात. अशाच चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या लोकप्रिय अभिनेत्री Krystle D’Souzaआहे. ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ गाण्यामुळे सध्या चर्चेत असलेली क्रिस्टल काही महिन्यांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळेही चर्चेत आली होती. आता तिने पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे तिच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.

एका अलीकडील मुलाखतीत Krystle D’Souza हिने करिअरसोबतच तिच्या प्रेमाविषयीचे विचार मोकळेपणाने मांडले. प्रेमाची व्याख्या सांगताना तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, तिच्यासाठी नात्यात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत – प्रामाणिकपणा, निष्ठा आणि एकमेकांचा सहवास. या तिन्ही गोष्टी नसतील, तर त्या नात्याला प्रेम म्हणता येत नाही, असं तिचं ठाम मत आहे. आजच्या काळात एका व्यक्तीत या सगळ्या गोष्टी एकत्र मिळणं कठीण झालं असल्याचंही तिने मान्य केलं.

याच कारणामुळे सध्या आपण सिंगल असून आनंदी असल्याचं Krystle D’Souza सांगते. चुकीच्या व्यक्तीबरोबर तडजोड करत राहण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं, असं तिचं मत आहे. जो माणूस आदर देत नाही किंवा सतत कमी लेखतो, अशा व्यक्तीबरोबर आयुष्य घालवणं तिला मान्य नसल्याचंही तिने ठामपणे सांगितलं. आत्मसन्मान जपणं तिच्यासाठी कोणत्याही नात्यापेक्षा महत्त्वाचं आहे.

दरम्यान, Krystle D’Souza गेल्या तीन वर्षांपासून कश्मिरी बिझनेसमन गुलाम गौस दीवानीला डेट करत होती. दोघेही एकत्र फिरताना, पार्टी करताना आणि सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ शेअर करताना अनेकदा दिसायचे. मात्र काही काळापूर्वी या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आणि क्रिस्टलने त्याच्यासोबतचे सगळे फोटो हटवले. सप्टेंबर महिन्यात या नात्याचा शेवट झाल्याचं समोर आलं.

याआधी एका मुलाखतीत Krystle D’Souza हिने नात्यांना नाव देण्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली होती. जोपर्यंत बोटात लग्नाची अंगठी नसेल, तोपर्यंत कोणत्याही नात्याला अधिकृत नाव देणं तिला योग्य वाटत नाही. तिच्या मते, आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नसतं, परिस्थिती बदलू शकते. मात्र लग्न ही तिच्यासाठी अत्यंत गंभीर आणि कायमस्वरूपी गोष्ट आहे.

हे पण वाचा.. मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरच्या लग्नाआधीची धमाल; हळदीचे खास फोटो व्हायरल

ब्रेकअपनंतरही सकारात्मक दृष्टिकोन ठेवत स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहणारी Krystle D’Souza सध्या तिच्या कामावर आणि स्वतःच्या आनंदावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

हे पण वाचा.. अभिनयासाठी घरचा विरोध, मारहाण आणि वेदना… तरीही हार न मानणारी कोमल कुंभार

Krystle D’Souza love and breakup thoughts