ADVERTISEMENT

ठरलं तर मग मधील प्रिया-चैतन्यने ‘दुनियादारी’ सीन केला भन्नाट रिक्रिएट, सेटवरचा धमाल व्हिडीओ व्हायरल

tharala tar mag priya chaitanya set var dhamal : ठरलं तर मग मालिकेतील प्रिया आणि चैतन्य यांच्या मजेशीर व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून पडद्यामागील धमाल पाहून चाहते खुश झाले आहेत.
tharala tar mag priya chaitanya set var dhamal

tharala tar mag priya chaitanya set var dhamal : झी मराठीवरील Tharala Tar Mag ही मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सातत्याने अव्वल स्थानी असलेली ही मालिका केवळ कथानकामुळेच नव्हे, तर कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांच्या ऑफस्क्रीन बॉण्डिंगमुळेही प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. सेटवर नेहमीच हसतमुख वातावरण असतं, याची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

मालिकेत अर्जुन आणि सायलीची भूमिका साकारणारे चैतन्य आणि प्रिया यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मराठी चित्रपट ‘दुनियादारी’मधील सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी यांच्या गाजलेल्या सीनचं रिक्रिएशन केलं आहे. मात्र, हे रिक्रिएशन पूर्णपणे हटके असून संवाद चित्रपटासारखे नसून थेट शूटिंगच्या शिफ्ट आणि पॅकअपभोवती फिरताना दिसतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना प्रेक्षकांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

प्रिया आणि चैतन्य यांच्यातील संवादांमध्ये सेटवरील रोजची गंमत, शिफ्ट एक्स्टेन्शन, पॅकअप आणि शेड्युलरशी होणाऱ्या चर्चा अगदी सहजपणे मांडल्या आहेत. त्यांची टायमिंग आणि एक्सप्रेशन्स इतकी नैसर्गिक आहेत की हा व्हिडीओ पाहताना कलाकार खऱ्या आयुष्यातही किती मजेशीर आहेत, याचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक हटके गाणं ऐकू येतं, जे जुई गडकरी (सायली) आणि अभिनेता प्रतिक सुरेश (अश्विन) यांनी स्वतः गायलेलं आहे. शूटिंगच्या गडबडीतूनच तयार झालेलं हे गाणंही चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

चैतन्यने शेअर केलेल्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. अभिनेत्री मोनिका दबाडे यांनी या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करत, हे फक्त तुम्हालाच जमू शकतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अश्विनी महांगडे आणि शिल्पा नवलकर यांनीही या व्हिडीओला भरभरून दाद दिली आहे. विशेष म्हणजे Tharala Tar Mag चे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीसुद्धा या व्हिडीओवर कमेंट करत प्रिया-चैतन्यच्या कल्पकतेचं कौतुक केलं आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखचा संताप, तन्वी कोलतेची घेतली चांगलीच शाळा

एकूणच, Tharala Tar Mag केवळ पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही कलाकारांची धमाल सुरू असल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात इतकी घट्ट रुजली आहे, यात आश्चर्य वाटायला नको.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : रुचिता जामदारचा आरडाओरडा पडला महागात, पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेशची कानउघडणी

tharala tar mag priya chaitanya set var dhamal