ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 : रुचिता जामदारचा आरडाओरडा पडला महागात, पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेशची कानउघडणी

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने रुचिता जामदारच्या वागणुकीवर थेट भाष्य केलं असून या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा निर्माण झाली आहे.
bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar : बिग बॉस मराठी ६ चा सहावा सीझन सुरू होताच घरात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अवघ्या पहिल्याच आठवड्यात घरात झालेला गदारोळ, भांडणं आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे प्रेक्षकांचे लक्ष या सीझनकडे वेधलं गेलं आहे. अशातच आज, १७ जानेवारी रोजी या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ पार पडणार असून त्याचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

या भाऊच्या धक्क्यावर सर्वप्रथम होस्ट रितेश देशमुख तन्वी कोलतेला काही मुद्द्यांवर जाब विचारताना दिसणार आहे. त्यानंतर मात्र त्याचा रोख थेट रुचिता जामदारकडे वळलेला पाहायला मिळतो. Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्या आठवड्यात रुचिताची वागणूक अनेकांना खटकली. फुटेजसाठी विनाकारण भांडणं, उंच आवाजात ओरडणं आणि आक्रमक बोलणं यामुळे ती सतत चर्चेत राहिली.

विशेषतः करण सोनावणेने तिच्याकडील पॉवर की परत देण्यास नकार दिल्यानंतर रुचिताने केलेला गोंधळ घरातल्या सदस्यांसह प्रेक्षकांनीही पाहिला. सुरुवातीला हात जोडून विनवणी करणारी रुचिता, नकार मिळताच बाल्कनी एरियामध्ये जोरजोरात ओरडताना दिसली. या दरम्यान तिने वापरलेली भाषा आणि तिचा आक्रमक पवित्रा अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला. सोनालीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, राग आरोग्यासाठी चांगला नसतो असा सल्लाही दिला, तरी रुचिताच्या वागण्यात फारसा बदल झाला नाही.

कॅप्टन्सी टास्कदरम्यानही रुचिता आणि करणमध्ये पुन्हा वाद झाले. पहिल्याच आठवड्यात अनेक सदस्यांशी तिने थेट भिडण्याची भूमिका घेतल्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली. याच सगळ्या पार्श्वभूमीवर Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अत्यंत ठाम शब्दांत तिची कानउघडणी केली.

“तुम्ही स्वतःला वाघीण म्हणता, पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःलाच पंजा मारणारी वाघीण पाहिली,” असं म्हणत रितेशने रुचिताच्या वागणुकीवर बोट ठेवलं. “प्रेक्षकांना वाटलं होतं तुम्ही या घराचा आवाज व्हाल, पण सध्या तुम्ही फक्त गोंधळ आहात,” अशी थेट टिप्पणी करत त्याने आपलं मत मांडलं. हे ऐकून रुचिता पूर्णपणे शांत झालेली दिसते आणि मान खाली घालून होस्टचं म्हणणं ऐकते.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखचा संताप, तन्वी कोलतेची घेतली चांगलीच शाळा

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून “योग्य शब्दांत सत्य सांगितलं”, “आवाज नाही तर गोंधळ”, “हा धक्का गरजेचा होता” अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, हा बहुचर्चित भाऊचा धक्का आज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हे पण वाचा.. पारू’ मालिकेतील प्रिया म्हणजेच संजना काळेने घेतली नवी कार, सोशल मीडियावर आनंद व्यक्त

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka ruchita jamdar