ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान गोंधळ, विशाल-ओमकारमध्ये जोरदार भिडंत

Bigg Boss Marathi 6 Captaincy Task : Bigg Boss Marathi 6 मध्ये पहिल्या आठवड्यातच कॅप्टन्सी टास्कदरम्यान वादाला उधाण आलं असून विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यातील आक्रमक भिडंतीमुळे घरात खळबळ उडाली आहे.
Bigg Boss Marathi 6 Captaincy Task

Bigg Boss Marathi 6 Captaincy Task : बिग बॉस मराठी ६ चा पहिला आठवडा संपत असतानाच घरातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. बुधवारी पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कनंतर गुरुवारच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क खेळवण्यात येणार असून, त्याचा प्रोमो सध्या प्रचंड चर्चेत आहे. पहिल्याच आठवड्यात सीझनचा पहिला कॅप्टन कोण होणार, याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे.

नॉमिनेशन टास्कदरम्यान बिग बॉसने दिलेल्या ट्विस्टमुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलली. पॉवर की असूनही शॉर्टकट दरवाजाने घरात आलेले तीन सदस्य थेट नॉमिनेट झाले, तर तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघी कॅप्टन्सीच्या शर्यतीत आल्या. या तिघींमधून कॅप्टन निवडण्यासाठी ‘BB फार्म’ नावाचा खास टास्क ठेवण्यात आला असून, ‘कार्य कॅप्टन्सीचं, झुंज समर्थकांची’ ही या टास्कची थीम आहे.

या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या दावेदारांच्या समर्थकांना फार्ममधील वस्तू गोळा करायच्या आहेत. मात्र, टास्क सुरू होताच वातावरण तणावपूर्ण झालं. Bigg Boss Marathi 6 च्या प्रोमोमध्ये विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यात जोरदार वाद होताना दिसतो. टास्कदरम्यान ओमकारच्या हातातील वस्तू घेण्यासाठी विशाल त्याला अडवतो आणि क्षणात परिस्थिती हाताबाहेर जाते. विशालने ओमकारचा गळा पकडल्याचा आरोप करत ओमकार जोरजोरात आरडाओरड करतो.

“गळा सोड, माझा गळा का दाबतोय?” असं ओरडत ओमकार स्वतःची सुटका करून घेतो. त्यानंतर दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद होतो. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून आयुष संजीव आणि दिव्या शिंदे मध्ये पडतात आणि शारीरिक हिंसाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. मात्र, ओमकार प्रचंड संतापलेला दिसतो आणि विशालवर गंभीर आरोप करतो. यावरून दोघांमधील तणाव आणखी वाढतो.

या प्रोमोवर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पहिल्याच आठवड्यात भांडण सुरू झाल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी Bigg Boss Marathi 6 मध्ये मराठी भाषेचा वापर जपण्याची मागणी केली आहे. “पहिल्या दिवसापासूनच ताकद दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag 15 January Episode Update: अर्जुन जखमी, प्रियाची उडाली झोप; महिपत पोलिसांच्या ताब्यात

पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये हाणामारीची वेळ आल्याने बिग बॉस घरातील नियमांचं उल्लंघन होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सगळ्या घडामोडी आज रात्री ८ वाजता Bigg Boss Marathi 6 च्या एपिसोडमध्ये स्पष्ट होणार आहेत.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये भीषण वळण! अंशुमनच्या कटामुळे रोहनचा अपघात, स्वानंदीवर मोठं संकट

Bigg Boss Marathi 6 Captaincy Task