ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 मध्ये पॉवर Key मुळे तिसऱ्या दिवशी मोठा गोंधळ, रुचिताचं स्वप्न धोक्यात?

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama : बिग बॉस मराठी ६ च्या घरात तिसऱ्याच दिवशी पॉवर Key वरून जोरदार ड्रामा पाहायला मिळणार आहे. करणकडे गेलेली रुचिताची Key तिच्यासाठी मोठी अडचण ठरण्याची चिन्हं आहेत.
bigg boss marathi 6 power key ruchita karan drama

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama : बिग बॉस मराठी ६ च्या घरात खेळाला वेगळीच दिशा देणारी ‘पॉवर Key’ आता वादाचं केंद्रबिंदू ठरत आहे. ग्रँड प्रीमियरच्या दिवशी शॉर्टकट निवडलेल्या स्पर्धकांना होस्ट रितेश देशमुख यांनी खास पॉवर Key दिली होती. या Key च्या मदतीने पुढे घरात काही विशेष अधिकार मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, एक महत्त्वाचा नियमही तेव्हाच सांगण्यात आला होता — ही Key जर दुसऱ्या स्पर्धकाच्या ताब्यात गेली, तर त्यासोबत मिळणारी पॉवरसुद्धा हातातून जाणार.

घरात अवघ्या तिसऱ्याच दिवशी नॉमिनेशन प्रक्रियेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पॉवर चेंबरमध्ये जाण्यासाठी शॉर्टकट निवडलेल्या प्रत्येक स्पर्धकाकडे स्वतःची पॉवर Key असणं अनिवार्य ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर रुचितासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. तिची पॉवर Key सध्या करण सोनावणेच्या ताब्यात असल्याचं समोर आलं आहे.

आपली Key आपल्याकडे नसल्याचं लक्षात येताच रुचिताने करणशी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला समजूत, मग विनवणी आणि अखेर भावनिक अपील… असं सगळं करूनही करण काही ऐकायला तयार नव्हता. प्रोमोमध्ये रुचिता इतकी भावुक झालेली दिसते की ती बाल्कनीमध्ये जाऊन करणसमोर हात जोडताना दिसते. तरीही त्याच्या भूमिकेत बदल होत नाही आणि शेवटी रुचिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसतात. Bigg Boss Marathi 6 मधील हा क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

या सगळ्या घडामोडींचं मूळ पहिल्याच दिवशी घडलेल्या एका वादात दडलं आहे. करणने स्विमिंग पूलचं पाणी प्यायल्यावर तन्वीने त्याला आरोग्याच्या दृष्टीने सल्ला दिला होता. मात्र, करणच्या हलक्याफुलक्या वक्तव्यामुळे तन्वी चिडली आणि दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी रुचिता मध्ये पडली आणि पुढे हा वाद थेट तन्वी-रुचिता यांच्यात जोरदार भांडणात बदलला. याच गडबडीत रुचिताने तिच्या पॉवर Key कडे दुर्लक्ष केलं आणि ती करणच्या हाती लागली.

करणने ही Key आपल्या ताब्यात असल्याचं बिग बॉसला दाखवलं होतं. आता पॉवर चेंबर उघडण्याची वेळ जवळ येत असताना ही Key रुचितासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. करण ती परत देणार का, की रुचिताला तिच्या एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.

हे पण वाचा.. वडिलांच्या आठवणीत भावूक झाली Prarthana Behere; “हा सिनेमा मी बाबांसाठीच केला”

Bigg Boss Marathi 6 मध्ये आता खरी खेळी सुरू झाली असून, पॉवर Key मुळे निर्माण झालेला हा संघर्ष पुढील समीकरणं पूर्णपणे बदलू शकतो. प्रेक्षकांसाठी हा ड्रामा नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

हे पण वाचा.. पायाला दुखापत झाली तरी केतकी माटेगावकरचा शो थांबला नाही; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील गाण्यांसाठी प्रेक्षकांची गर्दी

bigg boss marathi 6 power key ruchita karan drama