ADVERTISEMENT

ठरलं तर मग मालिकेमध्ये जंगलात थरारक संघर्ष, अर्जुनच्या धैर्यामुळे महिपत शिखेर अखेर पोलिसांच्या ताब्यात

tharala tar mag mahipat shikher arjun tharar : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली-अर्जुनच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असून, महिपत शिखेरच्या अटकेमुळे कथेला नवा वेग मिळाला आहे. थरारक प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
tharala tar mag mahipat shikher arjun tharar

tharala tar mag mahipat shikher arjun tharar :  स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या काही भागांपासून सायली आणि अर्जुन महिपत शिखेरचा शोध घेताना दिसत आहेत. महिपत अचानक गायब झाल्यानंतर त्यामागचं सत्य हळूहळू उलगडू लागलं असून, नागराजनेच त्याला आपल्या ताब्यात ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. नागराज आणि प्रिया आळीपाळीने महिपतवर नजर ठेवत असतात, मात्र याच दरम्यान सुमनच्या संशयाला बळ मिळतं.

सायलीने वारंवार समजावून सांगूनही सुमन आपल्या नवऱ्याचा पाठलाग करत राहते. अखेर नागराजने महिपत शिखेरचं अपहरण केल्याचं भयानक सत्य तिच्या डोळ्यांसमोर येतं. नवऱ्याला महिपतसोबत पाहिल्यावर सुमनला जबरदस्त धक्का बसतो. ही माहिती तात्काळ सायलीपर्यंत पोहोचवण्यासाठी ती फोन करते, मात्र सुभेदारांच्या घरात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे सायलीचा फोन वेळेत उचलला जात नाही. या एका क्षणाच्या विलंबामुळे परिस्थिती अधिकच बिघडते.

दूरून सगळं पाहणाऱ्या सुमनच्या नजरेस नागराज पडतो आणि तो तिला देखील महिपतसोबत बांधून ठेवतो. सुमन अचानक बेपत्ता झाल्याने किल्लेदारांच्या घरात प्रचंड खळबळ उडते. याचदरम्यान नागराज सुमनवर अत्याचार करत असल्याचं सत्य रविराजच्या लक्षात येतं आणि तो पूर्णपणे अस्वस्थ होतो. सायली आणि अर्जुन काहीही झालं तरी सुमन काकूंना शोधायचाच असा ठाम निश्चय करतात. सुमन सापडली तर महिपतचाही माग काढता येईल, याची त्यांना खात्री असते.

पोलीस सुमन आणि महिपतचं लोकेशन ट्रेस करतात, मात्र ही माहिती नागराजपर्यंत पोहोचते. तो प्रियाच्या मदतीने दोघांनाही दुसऱ्या ठिकाणी हलवतो. सायली-अर्जुन जेव्हा त्या ठिकाणी पोहोचतात, तेव्हा उशीर झालेला असतो. तरीही Tharala Tar Mag च्या नव्या प्रोमोमध्ये अर्जुन अखेर महिपतला गाठताना दिसतो.

जंगलात झालेल्या थरारक झटापटीत महिपत अर्जुनवर चाकूने वार करतो, ज्यामुळे अर्जुनच्या हाताला गंभीर जखम होते. मात्र जिद्द न सोडता अर्जुन महिपतचा पाठलाग करतो. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिपतवर अर्जुन दांडा फेकतो आणि तो खाली कोसळतो. याच क्षणी पोलीस घटनास्थळी पोहोचून महिपतला अटक करतात.

हे पण वाचा.. संघर्ष, हट्ट आणि स्वप्नांची जिद्द मुरांबा फेम अभिनेत्री निशाणी बोरुलेचा प्रेरणादायी प्रवास

घरी परतल्यावर अर्जुनच्या जखमा पाहून सायली भावूक होते. मात्र अर्जुन तिला धीर देत सांगतो की महिपत अटकेत आल्यामुळे प्रतिमा आत्या आणि सिनिअरच्या अपघातामागचं सत्य लवकरच समोर येईल. आता महिपत पोलिसांसमोर नागराजचं नाव उघड करणार का, सुमन सुरक्षित आहे का, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ११ ते १४ जानेवारीदरम्यान रात्री ८:३० वाजता येणारे विशेष भाग Tharala Tar Mag चाहत्यांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहेत.

हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ रात्री ८ वाजता का? वेळ बदलण्यामागचं खरं कारण समोर

tharala tar mag mahipat shikher arjun tharar