ADVERTISEMENT

निरोप घेताना मन भरून आलं…” गिरिजा प्रभूची भावुक पोस्ट, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेला निरोप

girija prabhu emotional post kon hotis tu kay zalis tu : ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिका संपल्यानंतर अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आहे. आठ महिन्यांच्या प्रवासानंतर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
girija prabhu emotional post kon hotis tu kay zalis tu

girija prabhu emotional post kon hotis tu kay zalis tu : मराठी टेलिव्हिजनवरील मालिकांचा चाहतावर्ग नेहमीच भावनिक असतो. रोज घराघरात दिसणारी पात्रं, त्यांचे सुख-दुःख, नाती आणि संघर्ष प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग बनतात. त्यामुळे एखादी आवडती मालिका संपते, तेव्हा केवळ प्रेक्षकच नव्हे तर कलाकारांच्याही भावना दाटून येतात. असाच भावुक क्षण सध्या लोकप्रिय मराठी मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ संपल्यानंतर पाहायला मिळत आहे.

ही मालिका २८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच कथानक, अभिनय आणि भावनिक गुंतवणुकीमुळे मालिकेने आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. या मालिकेत अभिनेत्री Girija Prabhu आणि मंदार जाधव यांची जोडी पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकली होती. कावेरी आणि यश यांची वेगळी, वास्तवाशी नातं सांगणारी प्रेमकहाणी प्रेक्षकांना आपलीशी वाटली.

जवळपास आठ महिने ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग बनली होती. मात्र ४ जानेवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि त्यासोबतच अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. मालिकेला निरोप दिल्यानंतर Girija Prabhu हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मालिकेतील तिच्या संपूर्ण प्रवासाचा व्हिडीओ शेअर करत रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

“मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार… असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असूद्या,” अशा साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांत Girija Prabhu हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. #onelasttime, #konhotistukayzalistu आणि #kaveri असे हॅशटॅग्स तिने या पोस्टसोबत वापरले असून, चाहत्यांकडून या पोस्टला भावनिक प्रतिसाद मिळत आहे.

मालिका संपल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर “मालिका अजून चालायला हवी होती” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. Girija Prabhu साठी ही मालिका करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरली असून, कावेरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणार आहे.

हे पण वाचा.. बँकेची नोकरी सोडून अभिनयाच्या दुनियेत यश मिळवलेली कुंजिका काळविंट

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ संपली असली, तरी Girija Prabhu आणि या मालिकेने दिलेल्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहणार आहेत.

हे पण वाचा.. ५ वर्षांपासून मानधन थकलं; शशांक केतकरचा निर्मात्यांवर थेट संताप

girija prabhu emotional post kon hotis tu kay zalis tu