jay dudhane arrest first reaction : ‘बिग बॉस मराठी 3’ चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधाणे याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात जय आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जयने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत लग्न केले होते, आणि त्यानंतर तो पत्नीसोबत हनिमूनसाठी परदेशात जाण्यास तयार होत होता. मात्र, या प्रवासाच्या अगोदरच पोलिसांनी त्याला रोखले.
जय दुधाणे यांनी अटकेनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, “मी कुठे पळून गेलो नाहीये. जे आहे त्याला मी हिंमतीने सामोरं जाणार आहे. पोलिसांनी माझ्या कुटुंबीयांसह माझ्या आजी-आजोबांनाही चौकशीसाठी समोर आणलं आहे. गाळा विकल्याबद्दल पसरवली गेलेली अफवा खोटी आहे. सत्य लवकरच समोर येईल. माझा चेहरा लपवला नाही आणि न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे.”
जयने आपल्या वक्तव्यात सांगितले की, “मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो. मी, माझी बायको, माझा भाऊ आणि त्याची बायको असे चार जण परदेशात जात होतो. मला अटक पत्र असल्याची माहिती नव्हती, पोलिसांनी सांगितले की मी देश सोडू शकत नाही. त्यामुळे मी पोलिसांना सामोरं जाणार आहे.”
अटकेमागे कारण ठरलं आहे की, जय दुधाणे आणि त्याच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकाने बेकायदेशीर पद्धतीने खरेदीदारांना विकली आहेत. या व्यवहारामुळे अनेक ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाले असून, एफआयआरमध्ये जयसह त्याच्या आई, बहीण, आजी आणि आजोबांची चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा.. कमळी मालिकेतील कमळीचा फोटो व्हायरल, साधेपणातलं सौंदर्य ठरतंय खास
या प्रकरणामुळे जय दुधाणेवर प्रेक्षकांची आणि माध्यमांची नजर लागली आहे. हनिमूनच्या तयारीत अटक झाली असली तरी, जयने स्पष्ट केलं की तो सर्व आरोपांना सामना करण्यास तयार आहे आणि सत्य लवकरच समोर येईल. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे, आणि जय दुधाणे यांच्या पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांत जय दुधाणे अडचणीत; फसवणूक प्रकरणात ठाणे पोलिसांची अटक







