lagnanantar hoilach prem jiva kavya mission : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Lagnanantar Hoilach Prem सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. २ जानेवारीच्या भागात प्रेक्षकांना प्रेम, धाडस आणि भावनांचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे. जिवा आणि काव्या दोघेही आपापल्या प्रेमासाठी पुन्हा एकदा लढण्याचा निर्धार करतात आणि इथूनच सुरू होतं त्यांचं खास ‘लग्नासाठी कायपण’ मिशन.
या भागात सुरुवातीला जिवा नंदिनीचं मनापासून कौतुक करताना दिसतो. त्याच वेळी काव्या पार्थविषयी आपली भावना उघडपणे व्यक्त करते आणि ती त्याच्या प्रेमात पडल्याचं मान्य करते. जिवाला याचा कुठलाही राग न येता उलट समाधान वाटतं, हे दृश्य दोघांमधील समजूतदारपणा दाखवणारं आहे. एका कॅफेमधील प्रसंगात मोठ्याने बोलल्यामुळे वेटरकडून त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं जातं. मात्र, याच अपमानातून जिवाच्या डोक्यात एक नवी कल्पना येते. काव्यालाही ती सकारात्मक वाटते आणि गुरुजींनी दिलेल्या सल्ल्याची आठवण त्यांना बळ देते. याच क्षणापासून Lagnanantar Hoilach Prem मधील ‘लग्नासाठी कायपण’ मोहिमेला सुरुवात होते.
दुसरीकडे, नंदिनीला तिची जिवलग मैत्रीण चित्रा भेटायला येते आणि तिचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी देते. नंदिनी हे ऐकून मनापासून खुश होते आणि लग्नाविषयी भरभरून बोलते. चित्रा नंदिनीला जिवासह तिच्या लग्नाला यायचं आमंत्रण देते, ज्यामुळे नंदिनीच्या भावना अधिकच गोंधळात पडतात
दरम्यान, जिवा नंदिनीकडे एक महिना राहायला जाण्याचा निर्णय घेतो आणि बॅग भरताना तिच्या फोटोसमोर मनातल्या भावना व्यक्त करतो. मानिनी आणि आशा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. हार मानू नकोस, असा धीर मानिनी जिवाला देते. काव्याही पार्थकडे जाण्यासाठी तयार होते आणि नंदिनीला स्पष्ट शब्दांत सांगते की ती तिचं हरवलेलं प्रेम परत मिळवायला चालली आहे. तिने फोनवरचं संभाषण ऐकल्याचं सांगत काव्या नंदिनीची समजूत काढते.
हे पण वाचा..ग्लॅमरच्या पलीकडे मातीशी नातं जपणारी अश्विनी महांगडे मामाच्या शेतातील फोटो चर्चेत
भागाच्या शेवटी जिवा पार्थला नंदिनीकडे राहायला जाण्याची माहिती देतो. पुढे कोणालाही त्रास होईल असं काही करणार नाही, असं आश्वासन देत तो पार्थची माफी मागतो. या भावनिक क्षणी पार्थही जिवाला ‘ऑल द बेस्ट’ म्हणतो. Lagnanantar Hoilach Prem मधील हे नवे वळण प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
हे पण वाचा.. रिंकू राजगुरूचा लावणी डान्स व्हायरल, नऊवारीत केलं भन्नाट सादरीकरण







