ADVERTISEMENT

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या दिग्दर्शकाने घेतली नवी गाडी

Tharla Tar Mag director Sachin Gokhale buys new car : लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’चे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी वर्षअखेरीस नवी गाडी खरेदी करत आनंद साजरा केला असून, कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tharla Tar Mag director Sachin Gokhale buys new car

Tharla Tar Mag director Sachin Gokhale buys  new car : स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दमदार कथानक, भावनिक वळणं आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अनेक महिन्यांपासून अव्वल स्थानी आहे. या यशामागे जितकं श्रेय कलाकारांचं आहे, तितकंच महत्त्व दिग्दर्शनाचंही आहे. याच मालिकेचे दिग्दर्शक Sachin Gokhale यांच्याशी संबंधित एक आनंदाची बातमी सध्या चर्चेत आली आहे.

वर्षअखेरीस Sachin Gokhale यांनी स्वतःसाठी एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. या खास क्षणाचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला. पत्नीसमवेत शोरूममध्ये जाऊन त्यांनी नव्या गाडीचं स्वागत केल्याचं व्हिडीओ आणि फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. “स्वामी पाठीशी आहेत… सदैव! श्री स्वामी समर्थ” अशा भावनिक कॅप्शनसह त्यांनी ही पोस्ट शेअर केली असून, त्यांच्या आनंदात चाहत्यांनीही मनापासून सहभाग घेतला आहे.

Sachin Gokhale यांनी महिंद्रा XEV 9e ही गाडी खरेदी केली आहे. ही गाडी सध्या विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे २१.९ लाख रुपयांपासून सुरू होते. वेगवेगळ्या व्हेरिएंट्स, इंधन प्रकार आणि शहरांनुसार किंमतींमध्ये बदल होऊ शकतो. आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही गाडी सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात चर्चेत आहे.

या आनंदाच्या बातमीवर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार आणि टीमकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. मालिकेचे निर्माता सोहम बांदेकर यांनी “अभिनंदन सर” अशी कमेंट करत आनंद व्यक्त केला. मालिकेत अस्मिता साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडे हिनेही “अभिनंदन, आता पार्टी पाहिजे” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. याशिवाय विवेक सांगळे, प्रतिक सुरेश, अभिषेक रहाळकर, स्वानंदी टिकेकर, प्राजक्ता दिघे, शिल्पा नवलकर यांसह अनेक कलाकारांनी Sachin Gokhale यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा.. Rupali Bhosle Video : १७ वर्षांची साथ, वाढदिवशी मदतनीस राजूकडून खास भेट; रूपालीने व्यक्त केल्या मनातल्या भावना

दरम्यान, मालिकेच्या कथानकातही सध्या उत्कंठावर्धक वळण आले आहे. रविराज आणि प्रतिमाचा अपघात घडवण्यासाठी महिपतला नेमकी कोणी मदत केली, याचा शोध अर्जुन आणि सायली घेत आहेत. हा रहस्य उलगडणार की नाही, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मालिकेची कथा रंगतदार होत असतानाच, दुसरीकडे Sachin Gokhale यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ही आनंदाची घडी चाहत्यांसाठीही खास ठरत आहे.

हे पण वाचा.. अभिनेता प्रसाद जवादे यांना मातृशोक; अमृता देशमुखची भावनिक पोस्ट व्हायरल

Tharla Tar Mag director Sachin Gokhale buys  new car