star pravah serial time slot change update : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत कार्यक्रमांच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक आशय असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका विशेष लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेच्या प्रसारणाची अधिकृत घोषणा Star Pravah कडून करण्यात आली असून ५ जानेवारीपासून ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मधुराणी प्रभुलकर आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख भूमिका असल्याने या मालिकेबद्दल आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे.
मात्र या घोषणेनंतर सध्या साडेसातच्या स्लॉटमध्ये सुरू असलेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचं काय होणार, असा प्रश्न अनेक प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. रेश्मा शिंदेची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका Star Pravah वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असून तिला चांगला टीआरपीही मिळत आहे. त्यामुळे ही मालिका ऑफ एअर होणार का, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मालिकेतील जानकी आणि हृषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी स्वतः प्रेक्षकांना मालिकेच्या नव्या वेळेबद्दल माहिती दिली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता ५ जानेवारीपासून दररोज रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. “नवीन वर्ष, नवीन वेळ” असं सांगत त्यांनी प्रेक्षकांना Star Pravah वरच ही मालिका पाहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, या बदलामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या रात्री १०:३० वाजता यश आणि कावेरी यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे आता या मालिकेचं पुढे काय होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम आहे. काहींच्या मते ही मालिका बंद होऊ शकते, तर काही जणांचा अंदाज आहे की तिची वेळ पुन्हा बदलली जाईल.
विशेष म्हणजे, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेची वेळ यापूर्वीही दोनदा बदलण्यात आली आहे. सुरुवातीला रात्री ८ वाजता सुरू झालेली ही मालिका नंतर ११ वाजता आणि त्यानंतर १०:३० या स्लॉटमध्ये आणण्यात आली होती. आता पुन्हा वेळ बदलल्यास हा तिसरा बदल ठरेल.
हे पण वाचा.. माई’ पुन्हा परतली! वर्षा उसगावकर यांची स्टार प्रवाहच्या ‘नशीबवान’ मालिकेत दमदार एन्ट्री
Star Pravah कडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाहिनी काय निर्णय घेते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. नव्या मालिकांच्या आगमनामुळे Star Pravah चं वेळापत्रक अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्की.
हे पण वाचा.. Lakshmi Niwas : मृत समजलेला श्रीकांत जिवंत, मालिकेत मोठ वळण









