vijaya babar sunidhi chauhan concert kamali dance video : बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान सध्या तिच्या दमदार इंडिया टूरमुळे प्रचंड चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कॉन्सर्टमध्ये असलेली ऊर्जा, थेट प्रेक्षकांशी साधलेला संवाद आणि सलग हिट गाण्यांचा पाऊस यामुळे तिचे कार्यक्रम खास ठरत आहेत. २४ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडलेला सुनिधी चौहानचा ग्रँड कॉन्सर्टही याला अपवाद ठरला नाही. या कार्यक्रमाला केवळ चाहत्यांचीच नाही, तर मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
या कॉन्सर्टमध्ये मराठी मालिकाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी ‘कमळी’ म्हणजेच अभिनेत्री Vijaya Babar सुद्धा सहभागी झाली होती. मालिकेत कायम साध्या लूकमध्ये, दोन वेण्या आणि भोळ्या स्वभावात दिसणारी कमळी प्रत्यक्षात किती स्टायलिश आहे, याचं दर्शन या कॉन्सर्टमधून घडलं. Vijaya Babar हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या कार्यक्रमातील अनेक इनसाईड व्हिडीओ शेअर केले असून ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
सुनिधी चौहानच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान Vijaya Babar ने ‘हलकट जवानी’ या गाण्यावर दिलखुलास डान्स केला. तिचा आत्मविश्वास, एक्सप्रेशन्स आणि मोकळेपणाने एन्जॉय करतानाचा अंदाज पाहून चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं. याशिवाय कतरिना कैफवर चित्रित झालेल्या ‘कमली’ या गाण्यावरही तिने ठेका धरला होता. मालिकेतील शांत, संयमी कमळीचा हा वेगळा अवतार प्रेक्षकांसाठी नक्कीच सुखद धक्का देणारा ठरला.
या कॉन्सर्टला Vijaya Babar सोबत ‘शिवा’ मालिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री सृष्टी बाहेकर देखील उपस्थित होती. या दोघींनी एकत्र ‘ऐनवई ऐनवई’ (बँड बाजा बारात) या गाण्यावर डान्स केला आणि हा क्षणही व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवला. शिवाय ‘कमळी’ मालिकेतील अनिका म्हणजेच केतकी कुलकर्णी आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकर यांनीही या कॉन्सर्टला हजेरी लावली होती.
मराठी कलाकारांबरोबरच बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा, श्रिया सरन, वामिका गब्बी आणि नितांशी गोयल यांची उपस्थितीही या कार्यक्रमाचं आकर्षण ठरली. संपूर्ण स्टेडियम चाहत्यांनी भरलेलं असून हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरला
हे पण वाचा.. रितेश देशमुखची दमदार एन्ट्री! Bigg Boss Marathi 6 ची थीम जाहीर, शो कधी आणि कुठे पाहता येणार?
दरम्यान, सुनिधी चौहानच्या इंडिया टूरमधील पुढील कॉन्सर्ट २७ डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. मुंबईप्रमाणेच तिथेही अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. Vijaya Babar च्या या व्हायरल डान्स व्हिडीओमुळे मात्र सध्या सोशल मीडियावर ‘कमळी’चाच बोलबाला पाहायला मिळत आहे.







