Jahnavi Killekar Murud Janjira village vlog : मराठी मनोरंजनसृष्टीत कोकणाशी नाळ जुळलेले अनेक कलाकार आहेत. कामाच्या धावपळीतून वेळ मिळाला की सणासुदीला किंवा सुट्टीत हे कलाकार आपल्या मूळ गावी परतताना दिसतात. याआधी अनेक अभिनेत्यांनी कोकणातील घर, वाडी, बागा आणि गावाकडचं साधं जीवन सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आता याच यादीत Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वामुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री Jahnavi Killekar हिचं नावही जोडले गेलं आहे.
Jahnavi Killekar नुकतीच कोकणातील मुरुड-जंजिरा येथे असलेल्या तिच्या गावी गेली होती. गावी पोहोचल्यानंतर तिने तिथले अनुभव एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले. या व्हिडीओमध्ये कोकणचा हिरवागार निसर्ग, साधी जीवनशैली आणि गावाकडचं रोजचं जगणं अगदी सहजपणे पाहायला मिळतं. गावी गेल्यावर जान्हवी सर्वात आधी बाजारात फिरायला गेली. मासळी बाजारात तिने स्वतः ताजे मासे खरेदी केले. सुरमई, पापलेट, कोळंबी यांसारख्या कोकणात हमखास मिळणाऱ्या माशांची झलक या व्हिडीओत दिसते.
मासे घेतल्यानंतर Jahnavi Killekar थेट आपल्या वाडीत पोहोचली. सुपारीच्या झाडांनी भरलेली ही प्रशस्त वाडी तिच्यासाठी खास असल्याचं ती सांगते. “आमची वाडी खूप मोठी आहे. इथे सुपारीची झाडं आहेत आणि गावी आल्यावर ही कामं करायला खूप छान वाटतं,” असं ती व्हिडीओत म्हणते. सुपाऱ्या वेचणं, त्या उन्हात सुकवणं, नंतर सोलणं – ही सगळी प्रक्रिया ती अगदी आपुलकीने सांगते. विशेष म्हणजे, तिच्या सासूबाईंनाही वाडीत फिरायला आवडतं आणि दोघी मिळून हा वेळ एन्जॉय करत असल्याचंही जान्हवीने नमूद केलं आहे.
या व्हिडीओला Jahnavi Killekar ने ‘मुरुड-जंजिरा Vlog’ असं कॅप्शन दिलं असून नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रेम केलं आहे. “जगात भारी आमची कोकणकन्या”, “गावाकडची साधी जान्हवी खूप छान दिसते”, “अभिनेत्री असूनही मातीशी जोडलेली” अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. कोकणातील निसर्ग, नारळ-सुपारीच्या बागा आणि साध्या आयुष्याची झलक पाहून अनेकांना आपल्या गावाची आठवण झाली आहे.
हे पण वाचा.. फक्त ५ मिनिटांची भेट, पण आयुष्यभराचं प्रेम; सिद्धार्थ चांदेकरच्या आईच भावुक सरप्राइज
कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून गावी जाऊन नात्यांशी आणि मातीशी नाळ जपणारी Jahnavi Killekar सध्या चाहत्यांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे. तिचा हा कोकणी अंदाज आणि साधेपणा प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटत असल्याचं या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे.
हे पण वाचा.. भर कार्यक्रमात कार्तिकी गायकवाडचा जादुई स्वर; स्टार प्रवाह मालिकेचं शीर्षकगीत ठरलं सोशल मीडियावर सुपरहिट







