ADVERTISEMENT

चेहरा दिसत नाही म्हणून काहीही? सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर क्रांती रेडकरांची ठाम भूमिका

Kranti Redkar reaction to the trolling of Sachin Pilgaonkar : सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर भाष्य करताना क्रांती रेडकर यांनी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची ठामपणे बाजू घेतली असून, ट्रोलर्सच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
Kranti Redkar reaction to the trolling of Sachin Pilgaonkar

Kranti Redkar reaction to the trolling of Sachin Pilgaonkar : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे कलाकारांच्या आयुष्यात कौतुकाइतकंच ट्रोलिंगही अटळ झालं आहे. एखादं वक्तव्य, मुलाखत किंवा मत क्षणार्धात व्हायरल होतं आणि त्यावर टीका सुरू होते. या ट्रोलिंगच्या झळा सध्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलाकार सचिन पिळगांवकर यांनाही बसत आहेत. त्यांच्या काही मुलाखतीतील वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर टीकेचा भडिमार झाला असून, यावर अभिनेत्री Kranti Redkar यांनी स्पष्ट आणि परखड प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत Kranti Redkar यांनी सचिन पिळगांवकर यांच्यावरील ट्रोलिंगबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, सचिन पिळगांवकर यांच्या बाबतीत ट्रोलर्सनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. इतक्या वर्षांपासून अथक मेहनत करणाऱ्या कलाकाराबद्दल अशा पद्धतीनं बोलणं अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी नमूद केलं. लहानपणापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेले सचिन पिळगांवकर हे मराठी चित्रपटसृष्टीचं एक भक्कम आधारस्तंभ आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली.

Kranti Redkar यांच्या मते, सोशल मीडियावर चेहरा दिसत नाही म्हणून कुणीही काहीही लिहावं, ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. समोरचा कलाकार काय म्हणतोय, त्यामागचं सत्य काय असू शकतं, याचा विचार न करता थेट टीका करणं चुकीचं आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीनं काही विधान केलं असेल, तर त्यामागे काहीतरी आधार नक्कीच असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय, जर ते विधान चुकीचं असेल तर संबंधित व्यक्ती स्वतः पुढे येऊन खुलासा करेल, असंही त्या म्हणाल्या.

ट्रोलिंग करताना भाषेची पातळीही जपली पाहिजे, असा ठाम मुद्दा Kranti Redkar यांनी मांडला. मतभेद असू शकतात, पण त्यासाठी अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरणं अजिबात योग्य नाही, असं त्या ठामपणे म्हणाल्या. कलाकारांवर टीका करणं सोपं असतं, पण त्यांच्या मेहनतीचा आणि योगदानाचा विचार फार कमी जण करतात, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

सचिन पिळगांवकर यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक अजरामर आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ यांसारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशा कलाकारावर सोशल मीडियावरून बेछूट टीका होणं, हे संपूर्ण इंडस्ट्रीसाठी चिंतेचं लक्षण असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे.

हे पण वाचा.. शुभमंगल सावधान! जय दुधाणे अडकला लग्नबंधनात; हर्षला पाटीलसोबत सुरू केला आयुष्याचा नवा प्रवास

एकूणच, Kranti Redkar यांच्या या प्रतिक्रियेमुळे कलाकारांच्या ट्रोलिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सोशल मीडियावरील जबाबदारी आणि संवेदनशीलतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

हे पण वाचा.. स्टार प्रवाहचा लाडका नायक मोठ्या पडद्यावर; हास्यजत्रेतील लोकप्रिय अभिनेत्रीही सोबत!

Kranti Redkar reaction to the trolling of Sachin Pilgaonkar