ADVERTISEMENT

अस्मिताच्या संशयाला दुजोरा! ठरलं तर मग मध्ये अर्जुनला बसणार जबरदस्त धक्का, सचिन-साक्षीच्या नात्यावर पडणार पडदा?

tharala tar mag asmita sachin sakshi exposed : ठरलं तर मग मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अस्मिताच्या नवऱ्याची पोलखोल होण्याचे संकेत मिळत असून, सचिनला साक्षीबरोबर रंगेहाथ पाहिल्याने अर्जुन पूर्णपणे हादरलेला दिसतो.
tharala tar mag asmita sachin sakshi exposed

tharala tar mag asmita sachin sakshi exposed : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या एकामागून एक धक्कादायक वळणांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सायलीने प्रियाची खोटी वागणूक उघड करत तिला चांगलाच धडा शिकवला. रोज काही ना काही कारण सांगून घराबाहेर पडणारी प्रिया प्रत्यक्षात अश्विनची फसवणूक करत असल्याचं सत्य आता सर्वांसमोर आलं आहे. ‘मैत्रिणीकडे जाते’, ‘पार्टीला आहे’ अशी कारणं देत ती महिपत-नागराजला भेटायला जात होती, हे अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलं आणि अखेर तिची पोलखोल झाली. त्यामुळे अश्विनचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं

पण प्रिया प्रकरण इथेच थांबणार नसून, Tharala Tar Mag मध्ये आता आणखी मोठा ट्विस्ट येणार असल्याचे संकेत प्रोमोमधून मिळत आहेत. प्रियापाठोपाठ आता अस्मिताच्या नवऱ्याची म्हणजेच सचिनचीही पोलखोल होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. सचिन आणि साक्षी शिखरे यांच्यातील गुप्त नातं हळूहळू उघडकीस येत आहे. आपली ओळख आणि रूप बदलून समाजात वावरणारी साक्षी अतिशय चलाखीने सचिनला आपल्या जाळ्यात ओढते. अस्मिताशी लग्न झालं असतानाही सचिन साक्षीच्या प्रेमात पूर्णपणे गुंतलेला आहे.

मागील काही भागांमध्ये अस्मिताने सचिनला एका कॅफेमध्ये अनोळखी मुलीबरोबर पाहिल्याचं दृश्य दाखवण्यात आलं होतं. मात्र, सचिनने आपल्या हुशारीने त्यातून स्वतःला वाचवलं. तरीही अस्मिता आणि सचिन यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच गेले. आता या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणारा प्रसंग प्रोमोमध्ये दिसतो, जिथे अर्जुन स्वतः सचिनला साक्षीबरोबर रोमँटिक क्षण घालवताना पाहतो.

हे दृश्य पाहून अर्जुनला प्रचंड धक्का बसतो आणि अस्मिताचा संशय खरा असल्याची जाणीव त्याला होते. मात्र, अर्जुनला सचिनसोबत दिसणारी मुलगी साक्षी शिखरेच आहे हे कळेल का, याबाबत प्रोमोमध्ये अजून स्पष्टता नाही. तो फक्त पाठमोऱ्या बसलेल्या सचिनला दुसऱ्या मुलीसोबत पाहतो, त्यामुळे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

या घटनेनंतर अर्जुन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो. घरी जाऊन तो कुटुंबीयांसमोर आपल्या विचारांचा उद्रेक करतो. तो ठामपणे सांगतो की, आपल्या कुटुंबापेक्षा मोठं त्याच्यासाठी काहीच नाही आणि कुटुंबीयांना दुखावणाऱ्याला तो कधीच माफ करणार नाही. अर्जुनचं हे अचानक वागणं पाहून सायली आणि अस्मिताही गोंधळून जातात.

हे पण वाचा.. चार पुरस्कार घरात आले…”अक्षया देवधर साठी २०२५ ठरलं अविस्मरणीय, ‘लक्ष्मी निवास’बद्दल मोकळेपणाने व्यक्त केल्या भावना

आता Tharala Tar Mag च्या आगामी भागांमध्ये अर्जुन सचिनला जाब विचारणार का, साक्षीची खरी ओळख उघड होणार का आणि अस्मिताच्या आयुष्यात पुढे काय वळण येणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.

हे पण वाचा.. मुंबई-पुणे नाही; संतोष पाटील यांनी साताऱ्यात घेतलं स्वतःचं हक्काचं घर, पत्नीसह केला गृहप्रवेश

tharala tar mag asmita sachin sakshi exposed