ADVERTISEMENT

अभिनयातून उद्योजकतेकडे… अमृता खानविलकर झाली बिझनेसवुमन, सुरू केला खास साड्यांचा ब्रँड

Amruta Khanvilkar starts a saree business named Amulya by Amruta : मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर आता बिझनेसवुमन झाली असून तिने ‘अमुल्य बाय अमृता’ नावाने स्वतःचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.
Amruta Khanvilkar starts a saree business named Amulya by Amruta

Amruta Khanvilkar starts a saree business named Amulya by Amruta : मराठी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात आपल्या अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी Amruta Khanvilkar आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. अभिनय, नृत्य आणि सादरीकरणातून नेहमीच वेगळी छाप पाडणाऱ्या अमृताने आता व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं असून तिने स्वतःचा साड्यांचा ब्रँड सुरू केल्याची घोषणा केली आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली असून, तिच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नोव्हेंबर महिन्यात Amruta Khanvilkar ने आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी तिने “लवकरच तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतेय” असं सांगत एक सूचक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. काहींनी तिच्या नव्या चित्रपटाचा अंदाज बांधला, तर काहींना वाटलं की अमृता एखादा नवा ब्रँड किंवा प्रोडक्शन हाऊस सुरू करणार आहे. वर्ष संपत असतानाच अमृताने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत तिच्या नव्या व्यवसायाची अधिकृत घोषणा केली.

Amruta Khanvilkar ने ‘अमुल्य बाय अमृता’ (Amulya by Amruta) असं तिच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव ठेवलं आहे. या ब्रँडची पहिली झलक तिने एका व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर सादर केली. या व्हिडीओमध्ये तिच्या कलेक्शनमधील आकर्षक, पारंपरिक आणि एलिगंट साड्या पाहायला मिळतात. अभिनेत्रीने या पोस्टसोबत लिहिलेलं कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. “माझ्या मनातून तुमच्यापर्यंत… काहीतरी अमूल्य येत आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे, Amruta Khanvilkar ने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच या ब्रँडची अधिकृत घोषणा केली होती. त्या पोस्टमध्ये तिने सांगितलं होतं की, नवीन ऊर्जा, नवीन स्वप्नं आणि चाहत्यांचं प्रेम सोबत घेऊन ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. जानेवारी २०२६ मध्ये हा ब्रँड अधिकृतपणे सादर केला जाणार असून, हा प्रोजेक्ट तिच्या मनाच्या फार जवळचा असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

हे पण वाचा.. होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिली झलक! अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा थाटात साखरपुडा

अमृताच्या या नव्या व्यावसायिक प्रवासासाठी संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मंजिरी ओक, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, सई गोडबोले, सोनाली खरे यांसारख्या कलाकारांनी Amruta Khanvilkar च्या या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं आहे. अभिनयासोबतच व्यवसायातही अमृता आपली वेगळी ओळख निर्माण करणार, याबाबत चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

हे पण वाचा.. लग्नासाठी काहीपण!’ लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत जीवा-काव्याचं नवं मिशन, प्रोमोने दिला दिलासा

Amruta Khanvilkar starts a saree business named Amulya by Amruta