ADVERTISEMENT

बायकोच्या कपाळावर ‘निर्लज्ज’ लिहिलं अन्… मी संसार माझा रेखिते मालिकेवर प्रेक्षकांचा संताप, “अतिरेक दाखवू नका” अशी मागणी

Mee Sansar Majha Rekhite serial controversy viewers angery : मी संसार माझा रेखिते मालिकेच्या वादग्रस्त प्रोमोमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून टीआरपीसाठी महिलांवरील अत्याचाराचं अतिरेकी चित्रण केल्याचा आरोप प्रेक्षक करत आहेत.
Mee Sansar Majha Rekhite serial controversy viewers angery

Mee Sansar Majha Rekhite serial controversy viewers angery : मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आणि भावनिकदृष्ट्या जोडलेला आहे. संध्याकाळ झाली की अनेक घरांमध्ये टीव्हीसमोर बसून मालिका पाहणं हा जणू दिनक्रमच बनला आहे. मात्र, सध्या टीआरपीच्या स्पर्धेत काही मालिकांकडून दाखवला जाणारा अतिरेक प्रेक्षकांच्या रोषाला कारणीभूत ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सन मराठी’ वाहिनीवरील Mee Sansar Majha Rekhite ही नवी मालिका सध्या प्रचंड वादात सापडली आहे.

डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या Mee Sansar Majha Rekhite या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. कलाकारांची निवड, कथेचा विषय पाहता ही मालिका वेगळी ठरेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच मालिकेच्या प्रोमोमधील काही दृश्यांमुळे प्रेक्षकांचा संयम सुटला आहे.

या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अनुप्रिया ही भूमिका साकारत असून तिच्या पतीच्या भूमिकेत अभिनेता हरीश दुधाडे झळकत आहे. कथानकात नवऱ्याचा जाच, सासरकडून होणारा मानसिक छळ आणि स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचं चित्रण दाखवण्यात येत आहे. मात्र, हेच चित्रण आता अतिरेकी पातळीवर गेल्याची भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये, अनुप्रिया दुसऱ्या पुरुषाचं कौतुक करते म्हणून रागाच्या भरात नवरा तिला जबरदस्तीने टोपभर बासुंदी प्यायला लावतो, असा धक्कादायक सीन दाखवण्यात आला. “आजच्या काळात असं काय दाखवताय?” असा सवाल करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आलेल्या नव्या प्रोमोने तर संतापाचा कळस गाठला.

या नव्या प्रोमोमध्ये नवरा अनुप्रियाच्या कपाळावर स्केच पेनने ‘निर्लज्ज’ असं लिहितो, असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. हे पाहून अनुप्रिया आणि तिच्या मुलीचे डोळे पाणावतात. हा सीन पाहून प्रेक्षक अक्षरशः हादरले असून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “टीआरपीसाठी काहीही दाखवू नका”, “लाज वाटली पाहिजे”, “ही मालिका ताबडतोब बंद करा” अशा असंख्य कमेंट्स Mee Sansar Majha Rekhite च्या प्रोमोखाली पाहायला मिळत आहेत.

हे पण वाचा..हा फोटो घ्यायला २२ वर्ष लागली रितेश देशमुखसाठी कपिल होनराव यांची भावनिक पोस्ट

प्रेक्षकांच्या मते, महिलांवरील अन्याय दाखवणं गरजेचं असलं तरी त्याचं सादरीकरण जबाबदारीने व्हायला हवं. विकृतपणा आणि अतिरेक दाखवून समाजाला काय संदेश दिला जातो, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या मालिकेत दीप्ती केतकर, हरीश दुधाडे, आभा बोडस आणि संजीवनी जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. Mee Sansar Majha Rekhite ही मालिका ‘सन मराठी’वर दररोज रात्री ९:३० वाजता प्रसारित होते.

आता या प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रियांवर निर्माते आणि वाहिनी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. लग्न म्हणजे फक्त रोमान्स नाही! स्वप्नील जोशी यांच्या पत्नी लीनाची पोस्ट व्हायरल

Mee Sansar Majha Rekhite serial controversy viewers angery