Soham Bandekar Dog Simba Passes Away Actor Share Emotional Post : मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचं कुटुंब नेहमीच आदर्श कुटुंब म्हणून ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा Soham Bandekar याचा विवाह थाटामाटात पार पडला होता. घरात आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचं वातावरण होतं. मात्र, या आनंदावर अचानक दुःखाची छाया पडली आहे. बांदेकर कुटुंबातील लाडका श्वान सिंबा याचं निधन झालं आहे.
सिंबा हा केवळ पाळीव प्राणी नव्हता, तर Soham Bandekar च्या आयुष्यातील अविभाज्य भाग होता. बालपणापासून तरुणपणापर्यंत जवळपास १७ वर्षे सिंबा सोहमसोबत होता. मित्र, रूममेट, आधार आणि निस्वार्थ प्रेम देणारा कुटुंबातील सदस्य अशीच त्याची ओळख होती. याच नात्याची झलक सोहमच्या लग्नातही पाहायला मिळाली होती. त्याची पत्नी पूजा बिरारी हिने आपल्या मेहंदीमध्ये सिंबाचं चित्र काढून घेतलं होतं, यावरून या कुटुंबासाठी सिंबा किती खास होता, हे स्पष्ट होतं.
सिंबाच्या निधनानंतर Soham Bandekar ने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो लिहितो की, वयाच्या २८ वर्षांत जवळपास १७ वर्षे सिंबा त्याचा सोबती होता. कायम पाठिशी उभा राहणारा, कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा आणि प्रत्येक क्षणी साथ देणारा असा तो होता. “तू जरी मला सोडून गेलास तरी कायम माझ्या मनात राहशील,” असे शब्द लिहिताना सोहमचं दुःख स्पष्टपणे जाणवतं.
या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांचे आणि मित्रांचेही आभार मानले आहेत. अनेकांनी सिंबाला कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, तरीही त्याच्याबद्दल आपुलकीने विचारपूस केली, ही गोष्ट सोहमने आवर्जून नमूद केली आहे. आदेश, सुचित्रा, पूजा आणि सोहम या सगळ्यांच्यावतीने त्याने सर्वांचे मनापासून आभार मानले.
दरम्यान, सिंबाच्या निधनामुळे केवळ बांदेकर कुटुंबच नाही तर मराठी कलाविश्वही भावुक झालं आहे. सचित पाटील, नीना कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, क्षिती जोग यांसारख्या कलाकारांनी Soham Bandekar च्या पोस्टवर प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे. या प्रतिक्रिया पाहता सिंबा किती जणांच्या मनात घर करून होता, हे पुन्हा एकदा दिसून येतं.
हे पण वाचा.. जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला…तारिणी मालिकेत भावनिक वळण, तारिणी आजीपासून दुरावणार का?
सिंबाचं जाणं ही एक मोठी पोकळी निर्माण करणारी घटना असली, तरी त्याच्या आठवणी आणि निस्वार्थ प्रेम कायमच बांदेकर कुटुंबाच्या मनात जिवंत राहणार आहेत.
हे पण वाचा.. अहिराणी ठेक्यावर थिरकली दिशा परदेशी; ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल









